दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दारुण पराभवानंतर झिम्बाब्वे कर्णधाराचा भारताला थेट इशारा (photo Credit- X)
झिम्बाब्वेने गेल्या दशकभरात भारतात एकही टी-२० सामना खेळलेला नाही. मात्र, या ऐतिहासिक तथ्याकडे दुर्लक्ष करत रझाने स्पष्ट केले की, तो स्थानिक परिस्थितीचे कोणतेही बहाणे सांगणार नाही. ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना धूळ चारल्यानंतर आता झिम्बाब्वेचा संघ सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत यांच्याशी दोन हात करणार आहे.
IND VS SA T20 World Cup: अक्षर पटेलला संघात स्थान का नाही? कोच म्हणाले, “संघाने पॉवरप्लेमध्ये…”
रझा म्हणाला, “निकालाची आम्हाला चिंता नाही. आम्ही येथे परिस्थितीशी जुळवून घेऊ शकलो नाही, असे रडगाणे आम्ही कधीच गाणार नाही. झिम्बाब्वेचे चाहते आणि आमचा संघ असा विचार करत नाही. आम्ही केवळ आमच्या तयारीवर आणि मानसिकतेवर लक्ष केंद्रित करत आहोत.”
स्वतः आयपीएलमध्ये खेळलेला सिकंदर रझा संघासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्याने वानखेडे स्टेडियमवरील वॉर्म-अप आणि नेट सेशन्सचा उल्लेख करत सांगितले की, संघातील काही खेळाडूंनी भारतात खेळले आहे तर काहींनी नाही, पण त्याचा खेळावर परिणाम होणार नाही. “मैदान लहान असो किंवा मोठे, दोन्ही संघांसाठी परिस्थिती सारखीच असते. मला वैयक्तिकरित्या आयपीएलमध्ये खेळल्याचा मोठा फायदा झाला आहे. आमचा संपूर्ण भर सर्वोत्तम कामगिरी करून विजय मिळवण्यावर आहे,” असे त्याने आत्मविश्वासाने नमूद केले.
झिम्बाब्वे संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचेल का? या प्रश्नावर रझाने अत्यंत मार्मिक उत्तर दिले. तो म्हणाला, “किती लोकांनी झिम्बाब्वेला सेमीफायनलसाठी निवडले आहे? कदाचित कोणीच नाही! हीच गोष्ट आम्हाला अधिक प्रेरित करते. आम्ही तिथपर्यंत पोहोचू की नाही हे माहित नाही, पण कर्णधार म्हणून मी खात्री देतो की आम्ही आमची संपूर्ण ताकद पणाला लावू.” रझाने शेवटी सांगितले की, ग्रुप स्टेजमधील विजयानंतर संघातील आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. प्रत्येक विजयामुळे संघात सकारात्मक बदल होत असून, हीच ऊर्जा सुपर-८ मध्ये भारतासारख्या मोठ्या संघाविरुद्ध कामी येईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.






