
Bangladesh Violence: After Mustafizur Rahman, a major blow for Bangladeshi players! Indian sponsors withdraw.
Sponsorship deals of Bangladeshi players cancelled : बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. आता बांगलादेशच्या खेळाडूंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून या पार्श्वभूमीवर भारताची आघाडीची क्रीडा सौंदर्यप्रसाधने कंपनी एसजीकडून बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसजी कर्णधार लिटन दास, यासिर रब्बी आणि मोमिनुल हक यांच्यासह बांगलादेशच्या शीर्ष खेळाडूंना प्रायोजित करत आली आहे. खेळाडूंना त्यांच्या करारांचे नूतनीकरण न झाल्याबद्दल अधिकृतपणे काही एक कळविण्यात आले नसून त्यांच्या एजंटना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा : WPL 2026: पहिल्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा झटका! ‘ही’ स्टार अष्टपैलू खेळाडू सुरुवातीच्या सामन्याला मुकणार…
“येत्या काही दिवसांमध्ये असे होण्याची शक्यता आहे असे दिसते,” असे एका बांगलादेशी क्रिकेटपटूकडून टेलिकॉम एशिया नेटकडून म्हणण्यात आले आहे. एसजीने करारांचे नूतनीकरण करण्यास नकार देण्यात आल्याने बांगलादेश क्रीडा उद्योगाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भविष्यात इतर कंपन्या देखील असाच काही निर्णय घेण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या प्रायोजकत्वाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, “मला वाटते की इतर कंपन्या देखील आमच्या क्रिकेटपटूंना प्रायोजित न करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.”
बीसीसीआयने दिलेल्या आदेशानुसार केकेआरकडून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला मुक्त करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमधील तनाव अधिकच वाढला आहे. या प्रकारनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीला बांगलादेशचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती करण्यात आली. मात्र, आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती फेटाळून लावली. आयसीसीने यावर म्हटले आहे की, २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी बांगलादेश क्रिकेट संघाला भारतात जावे लागणार आहे. यावेळी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी बीसीसीआयची असणार आहे.
हेही वाचा : RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी
बांगलादेशात हिंदूंविरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. म्हणूनच मुस्तफिजुर रहमान आयपीएलमध्ये खेळण्याविरुद्ध भारतात निदर्शने देखील घडून आली आहे. मोठ्या प्रमाणात निषेध झाल्यानंतर, बीसीसीआयने केकेआरला रहमानला सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वादाची ठिणगी पडली.