Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक डाव, दोन वर्ल्ड रेकॉर्ड! Shafali Verma ने पाकिस्तानविरुद्ध केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी; २२व्या वर्षी दिग्गजांनाही टाकले मागे

Shafali Verma becomes youngest & fastest 3000 Women's T20I runs: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची स्फोटक फलंदाज शफाली वर्माने इतिहास रचला आहे. तिने या सामन्यात ३,००० टी-२० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करून शफाली वर्माने दोन मोठे विक्रम मोडले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 06, 2026 | 01:31 PM
Shafali Verma Completed 3000 T20I runs

Shafali Verma Completed 3000 T20I runs

Follow Us
Follow Us:
  • Shafali Verma चा विक्रमी धमाका
  • २२व्या वर्षी दिग्गजांनाही टाकले मागे
  • ३ हजार T20I धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला
महिला टी-२० आशिया कपमध्ये शनिवार ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्स धुव्वा उडवत दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात, टीम इंडियाची स्टार युवा सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने आपल्या १२ धावांच्या छोट्या खेळीने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला. आयर्लंडच्या गॅबी लुईसचा विक्रम मोडून, ​​शफाली आता महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,००० धावांचा टप्पा गाठणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे.

नवा मालक, नवी सुरुवात… RCB चं नाव बदलणार? आर्यमन बिर्लांनी केला मोठा खुलासा; म्हणाले…

३००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण फलंदाज

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शफाली वर्माने शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या महिला आशिया कप गट ‘अ’ सामन्यात इतिहास रचला. तिने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण केले. याशिवाय दोन मोठे विक्रम मोडले. शफाली हा ऐतिहासिक टप्पा गाठणारी सर्वात वेगवान आणि सर्वात तरुण फलंदाज ठरली आहे. शफालीने वयाच्या २२ व्या वर्षी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३००० धावा पूर्ण करून विश्वविक्रम रचला. तिने आयर्लंडच्या गॅबी लुईसचा विक्रम मोडला. गॅबीने वयाच्या २४ वर्षे आणि ३४७ दिवसांत हा पराक्रम केला होता. याशिवाय, शफालीने सर्वात कमी चेंडूंमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या. तिने हा आकडा केवळ २१८२ चेंडूंमध्ये गाठला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू एलिसा हिलीच्या नोंदवला होता. एलिसाने २३२१ चेंडूंमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या होत्या. पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली असली तरी, शफालीने इतिहास रचला आहे. शफालीने तिच्या ११४ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ही कामगिरी केली. शेफालीने आतापर्यंत ११३ डावांमध्ये ३०५५ धावा केल्या आहेत.

शेफालीने २०१९ मध्ये वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आता ती महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३,००० धावा पूर्ण करणारी तिसरी भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी यापूर्वीच हा पराक्रम केला आहे. शेफाली तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी, तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा अनुभव मिळवला आहे आणि महिला क्रिकेटमधील सर्वात धोकादायक सलामीवीरांपैकी एक म्हणून स्वतःला स्थापित केले आहे.

महिला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३,००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण खेळाडू

  • शफाली वर्मा – २२ वर्षे २२० दिवस – (भारत)
  • गॅबी लुईस – वय २४ वर्षे ३४७ दिवस – (आयर्लंड)
  • ईशा ओझा – वय २७ वर्षे १३९ दिवस – (यूएई)
  • स्मृती मानधना – २७ वर्षे १७१ दिवस- (भारत)
  • हेली मॅथ्यूज – २७ वर्षे ३४७ दिवस – (वेस्ट इंडीज)
Neeraj Chorpa बाहेर अन् अचानक ‘या’ खेळाडूची एन्ट्री! Asian Games 2026 मध्ये कोण घेणार गोल्डन बॉयची जागा?

Web Title: Shafali verma youngest fastest 3000 t20i runs pakistan match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND VS PAK
  • IND W vs PAK W
  • Shafali Verma

संबंधित बातम्या

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून केले पराभूत; सलग तिसऱ्यांदा नोंदवला विजय
1

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून केले पराभूत; सलग तिसऱ्यांदा नोंदवला विजय

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद
2

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार
3

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार

IND W vs PAK W:आशिया कपमध्ये आज रंगणार थरार! भारत-पाकिस्तान आमनेसामने; महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?
4

IND W vs PAK W:आशिया कपमध्ये आज रंगणार थरार! भारत-पाकिस्तान आमनेसामने; महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.