Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

virat kohli test retirement : विराट कोहली निवृत्त अन् ‘या’ दमदार खेळाडूची भारतीय संघात होईल वापसी! वाचा नेमकं गणित काय? 

भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. त्या आधीच रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केलीय आहे. त्या पाठोपाठ विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या विचारात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 12, 2025 | 10:06 AM
virat kohli test retirement: Virat Kohli retires and 'this' strong player will return to the Indian team! Read what is the exact math?

virat kohli test retirement: Virat Kohli retires and 'this' strong player will return to the Indian team! Read what is the exact math?

Follow Us
Close
Follow Us:

virat kohli test retirement :भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. जिथे संघ इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे तर आता अशीही चर्चा समोर आली आहे की,  विराट कोहली देखील कसोटीला अलविदा म्हणण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या महितीनुसार, बीसीसीआयकडून २२-२३ मे रोजी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात येणार आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर शुभमन गिलला भारताचा नवा कसोटी कर्णधार बनण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे, कोहलीच्या कसोटीतून निवृत्तीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. आशावेळी,  जर कोहली सहमत न होता त्याने निवृत्ती घेतली तर दोन खेळाडू कसोटी संघात परतणार आहेत.  क्रिकबझच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याला कोहलीच्या जागी कसोटी संघात स्थान देण्यात येईल.

हेही वाचा : Archery World Cup : तीरंदाजी विश्वचषकात भारताचा डंका! सात पदके जिंकून केली नेत्रदीपक कामगिरी, वाचा सविस्तर..

यापूर्वी जेव्हा कोहलीच्या निवृत्तीच्या कोणत्याच बातम्या नव्हत्या, तेव्हा श्रेयस अय्यरचे पुनरागमन कठीण मानले जात होते. परंतु, आता जर कोहलीने अचानक कसोटीतून माघार घेतली तर त्याच्या जागी अय्यरला संधी मिळण्याची दाट शक्यता  वर्तवण्यात येत आहे. अहवालात म्हटले आहे की श्रेयस अय्यरची निवड निश्चित नाही. तो सध्या भारत अ किंवा भारतीय संघासाठी निवडकर्त्यांच्या योजनांमध्ये देखील नाही. पण अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र  कोहलीच्या निवृत्तीनंतर निवड समिती अय्यरबद्दल नक्कीच विचार करेल अशी माहिती मिळत आहे.

शार्दुल ठाकूर कसोटी संघात परतण्याची शक्यता..

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शार्दुल ठाकूर टीम इंडियाचा भाग होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवड समिती शार्दुलच्या पुनरागमनाचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. क्रिकबझच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी  सज्ज असल्याचे बोलले जात आहे. ठाकूरने १२ ऑक्टोबर २०१८ रोजी हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. लॉर्ड शार्दुलने आतापर्यंत भारतासाठी एकूण ११ कसोटी सामने खेळले असून ३१  विकेट्स घेण्याव्यतिरिक्त त्याने ३३१ धावा देखील केल्या आहेत.

हेही वाचा : India pak war : ‘मोदींच्या युद्ध प्रेमाने..’, Shahid Afridi ने पुन्हा भारताविरुद्ध ओकली गरळ, पंतप्रधानांबद्दलही आक्षेपार्ह विधान..

शार्दुलने डिसेंबर २०२३ मध्ये सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन घरच्या मालिका आणि पाच सामन्यांच्या मालिकेसाठीही त्याची निवड करण्यात आली नाही.  ज्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून १-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

Web Title: Shardul thakur will make a comeback to the indian team after virat kohli retires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Test cricket
  • virat kohali

संबंधित बातम्या

रोहित शर्माच्या फिटनेसची चलती! विराट कोहलीलाही टाकले मागे? ‘हिटमॅन’चा सुपर अवतार पाहिलात का? पहा VIDEO
1

रोहित शर्माच्या फिटनेसची चलती! विराट कोहलीलाही टाकले मागे? ‘हिटमॅन’चा सुपर अवतार पाहिलात का? पहा VIDEO

IND vs NZ Head to Head: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणाचा वरचष्मा? मालिका सुरू होण्यापूर्वी वाचा हेड टू हेड रेकाॅर्ड
2

IND vs NZ Head to Head: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणाचा वरचष्मा? मालिका सुरू होण्यापूर्वी वाचा हेड टू हेड रेकाॅर्ड

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
3

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 
4

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.