
क्रिकेट हा केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगतात एक प्रसिद्ध खेळ समजला जातो. मात्र आज आपण श्री चरणी या भारतीय महिला फिरकीपटूची कहाणी जाणून घेणार आहोत. आंध्र प्रदेशच्या येरामल्ला गावात जन्म झालेल्या श्री चरणीने आज भारतीय क्रिकेटमध्ये आपले नाव मोठे केले आहे.
वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय महिला संघातून श्री चरणी सध्या खेळत आहे. आयसीसी टी २० महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताची प्रमुख स्पिनर म्हणून खेळत आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये श्री चरणीने शानदार कामगिरी केली आहे. मात्र या सर्व आनंदामागे तिने केलेले अपार कष्ट, अनेक अडचणींचा तिने सामना केला आहे.
श्री चरणीचा जन्म अत्यंत सर्वसामाने कुटुंबात झाला. चंद्रशेखर रेड्डी असे तिच्या वडिलांचे नाव. ते एका थर्मल पॉवर प्लांटमध्ये काम करायचे. श्री चरणीला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. तिसरी इयत्तेत शिकत असताना श्री चरणीने प्लॅस्टिकच्या बॅटने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. तिथूनच तिला भारतासाठी खेळण्याची जिद्द निर्माण झाली. तिथूनच श्री चरणीचा भारतीय संघात प्रवेश करण्याचा प्रवास सुरू झाला. श्री चरणीचा जन्म ४ ऑगस्ट २००४ रोजी झाला श्री चरणीला क्रिकेटच खेळण्यात जास्त रस होता. तिच्या मामाने तिला पाठिंबा दिल्याने तिने क्रिकेट खेळणे सुरू ठेवले.
श्री चरणीने प्लॅस्टिक बॅटने खेळण्यास सुरुवात केली. गावच्या मातीतून निघून थेट २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजयाची शिल्पकार होण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास निव्वळ थक्क करणारा आहे. अथक जिद्द आणि मेहनतीच्या जोररावर आंध्र प्रदेशच्या अंतर्गत संघातून खेळू लागली. तिने त्या ठिकाणी आपले कर्तुत्व सिद्ध केले. २०२५ मध्ये तिच्या आयुष्याला आणि क्रिकेट करियरला कलाटणी मिळाली. डेहराडून येथे झालेल्या सिनियर महिला मल्टि-डे चॅलेंजर ट्रॉफीमध्ये भेदक गोलंदाजी करत ५ पेक्षा जास्त विकेट्स पटकावल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमध्ये तिला २५ लाखांमध्ये खेळण्यासाठी सामील करून घेतले.
२०२५ मध्ये श्री चरणीने खूप कमाल कामगिरी केली. २० व्या वर्षी तिची निवड आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक संघामध्ये झाली. या स्पर्धेत तिने उत्कृष्ट गोलंदाजी करत फलंदाजांना जेरीस आणले. तिने या स्पर्धेत १४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने श्री चरणीला १.३ कोटींमध्ये संघात सामील करून घेतले. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध श्री चरणीने ३ विकेट्स घेतल्या. ग्रामीण भागात तिच्या क्रिकेट खेळण्याला झालेला विरोध, प्लॅस्टिक बॅटपासून सुरू केलेला प्रवास आज एक सर्वोत्तम भारतीय स्पिनर म्हणून ओळखला जात आहे. श्री चरणीने आंध्र प्रदेशसह संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे.