Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

shubman gill broke virat kohli record scoring 334 Runs vs WI: भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३३४ धावा केल्या यासह त्.ाने मोठा विक्रम प्रस्थापित केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 04, 2026 | 04:44 PM
shubman gill broke virat kohli record

shubman gill broke virat kohli record

Follow Us
Follow Us:
  • गिलचा ‘विराट’ पराक्रम
  • १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
  • ३३४ धावांसह गिलचा ऐतिहासिक कारनामा
India vs West Indies: भारतने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना गमावला. परंतु टीम इंडियाने मालिका २-१ ने खिशात घातली. दरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) या मालिकेत आपल्या बॅटने धुमाकूळ घातला. गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले, तर दुसऱ्या सामन्यात सर्वात जलद द्विशतक झळकावून इतिहास रचला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो केवळ १ धावेवर बाद झाला असला तरी, त्याने मालिकेत असा विक्रम रचला जो यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराने केला नव्हता. गिलने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३३४ धावा करून १५ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला.

India vs Brazil: पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर भारताची कोंडी! ब्राझीलने टीम इंडियाचा 4-0 ने केला गेम ओव्हर

शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत इतिहास रचला

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शुभमन गिलने तीन डावांमध्ये एक शतक आणि एक द्विशतक झळकावत एकूण ३३४ धावा केल्या. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी १६७ होती. या प्रभावी कामगिरीसह गिलने झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा १५ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. गिल आता कर्णधार म्हणून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने ब्रेंडन टेलर, बाबर आझम आणि शाई होप यांना मागे टाकत या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो जगातील दुसरा कर्णधार आहे. गिलच्या आधी, भारतीय कर्णधार म्हणून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २६३ धावा केल्या होत्या. आता गिलने ३३४ धावा करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

  • शुभमन गिल (भारत) – वेस्ट इंडिज विरुद्ध ३३४ धावा , २०२६
  • ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे) – न्यूझीलंड विरुद्ध ३१० धावा , २०११
  • शाई होप (वेस्ट इंडिज) – भारत विरुद्ध २७८ धावा, २०२६
  • बाबर आझम (पाकिस्तान) – ऑस्ट्रेलिया विरुद्ध २७६ धावा, २०२१
  • कुर्रम खान (यूएई) – अफगाणिस्तान विरुद्ध २७० धावा , २०१४

मालिकावीर गिलने धोनी आणि गांगुली यांच्या पंक्तीत विराजमान

शुभमन गिल तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३३४ धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हा सातवा मालिकावीर पुरस्कार होता. यासह, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत सौरव गांगुली, युवराज सिंग आणि एम.एस. धोनी यांची बरोबरी केली. आता केवळ सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनीच एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी मालिकावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत गिलला मागे टाकले आहे.

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक

Web Title: Shubman gill scored 334 runs against west indies broke virat kohli record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • IND vs WI 3rd T20
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक
1

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक

IND vs WI 3rd ODI Live: आधी हिटमॅनची वादळी खेळी, मग राहुलचं झंझावाती शतक! टीम इंडियाने वेस्टइंडिजसमोर ठेवलं ३५२ धावांचं टार्गेट
2

IND vs WI 3rd ODI Live: आधी हिटमॅनची वादळी खेळी, मग राहुलचं झंझावाती शतक! टीम इंडियाने वेस्टइंडिजसमोर ठेवलं ३५२ धावांचं टार्गेट

IND vs WI 3rd ODI Live: हिटमॅनचा ‘विराट’ पराक्रम! Rohit Sharma ने सचिन तेंडुलकरचा २२ वर्षांचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त
3

IND vs WI 3rd ODI Live: हिटमॅनचा ‘विराट’ पराक्रम! Rohit Sharma ने सचिन तेंडुलकरचा २२ वर्षांचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी
4

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.