Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…

Cricket: पहिल्या सामन्यात आर्यष तिवारीच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमीने फॅन्टम क्रिकेट क्लबचा ४४ धावांनी पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2026 | 09:45 PM
अवधुत विभुते ॲकॅडमीचा विजय

अवधुत विभुते ॲकॅडमीचा विजय

Follow Us
Follow Us:
  • स्पार्क स्पोर्टीव्ह, अवधुत विभुते ॲकॅडमीचा विजय
  • आर्यष तिवारीच्या अचूक गोलंदाजीने स्पार्कला ४४ धावांनी यश
  • भुजंग धुलगूंडेच्या ६५ धावांच्या जोरावर अवधुत विभुतेचा चार गडी राखून विजय
पुणे/Cricket: स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सून लीग’ अजिंक्यपद १४ वर्षांखालील ३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमी आणि अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी कामगिरी केली. सातारा रोड येथील टेंभेकर फार्म्स क्रिकेट (Pune) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील सामन्यांमध्ये युवा खेळाडूंनी दमदार फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

पहिल्या सामन्यात आर्यष तिवारीच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमीने फॅन्टम क्रिकेट क्लबचा ४४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमीने २५ षटकांत ९ गडी गमावून १४८ धावा केल्या. आरव पांडेने ४५ धावा, तर हित कारीयाने ३७ धावांची उपयुक्त खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला.

असिमची अप्रतिम गोलंदाजी

फॅन्टम क्रिकेट क्लबकडून असिम मुजावरने प्रभावी गोलंदाजी करत २२ धावांत ४ गडी बाद केले. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना फॅन्टमचा डाव २३.१ षटकांत १०४ धावांवर आटोपला. असिम मुजावरने ४६ धावांची झुंजार खेळी करत एकहाती लढा दिला. त्याला जयेश वर्माने २५ धावांची साथ दिली. स्पार्ककडून आर्यष तिवारीने भेदक गोलंदाजी करत २ षटके निर्धाव टाकली. त्याने अवघ्या ७ धावांत ४ गडी बाद केले. हित कारीयाने ३ गडी बाद करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीसाठी आर्यष तिवारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

आर्यन एसची दमदार फटकेबाजी

दुसऱ्या सामन्यात भुजंग धुलगूंडेने केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीने मिलेनीयम नॅशनल स्कूलचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मिलेनीयम नॅशनल स्कूलने ३० षटकांत ७ गडी बाद १५१ धावा केल्या. आर्यन एस. याने अर्धशतकी खेळी करत ५० धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत ८ चौकारांचा समावेश होता. रूद्र देशपांडेने १८ धावा केल्या.अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीकडून सार्थ बदाडेने २ गडी, तर यज्ञेश मोहितेने १ गडी बाद केला.

विजयासाठी मिळालेले १५२ धावांचे लक्ष्य अवधुत विभुते ॲकॅडमीने अवघ्या १९.१ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले. भुजंग धुलगूंडेने आक्रमक फलंदाजी करत २९ चेंडूंत ६५ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत तब्बल १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. मेधांश अगरवालने ३१ धावांची, तर यज्ञेश मोहितेने नाबाद १७ धावांची खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. मिलेनीयम नॅशनल स्कूलकडून शार्व दळवी आणि कैवल्य खोंडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. भुजंग धुलगूंडेची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Web Title: Spark wins 44 runs in sportsfield monsoon league thanks to aryash tiwari precise bowling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद, शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद; तब्बल २२ संघांचा समावेश
1

टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद, शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद; तब्बल २२ संघांचा समावेश

समर्थ जाधवचा ऑलराउंडर जलवा! खणखणीत शतक अन् ३…; पूना क्लबला मिळवून दिला दणदणीत विजय
2

समर्थ जाधवचा ऑलराउंडर जलवा! खणखणीत शतक अन् ३…; पूना क्लबला मिळवून दिला दणदणीत विजय

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
3

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.