Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समर्थ जाधवचा ऑलराउंडर जलवा! खणखणीत शतक अन् ३…; पूना क्लबला मिळवून दिला दणदणीत विजय

Cricket: दुसऱ्या सामन्यात कृष्णा राऊतच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर सार्क क्रिकेट अकादमीने द क्रिकेट क्लब ऑफ रोहित संघाचा ९० धावांनी पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2026 | 06:37 PM
सार्क क्रिकेट अकादमीचा दणदणीत विजय

सार्क क्रिकेट अकादमीचा दणदणीत विजय

Follow Us
Follow Us:
  • डीएसपी करंडक स्पर्धेत समर्थ जाधवचे खणखणीत शतक
  • सार्क क्रिकेट अकादमीचा दणदणीत विजय
  • कृष्णा राऊतचे अवघ्या ९ धावांत ४ गडी

पुणे/Cricket League: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक१४ वर्षांखालीलक्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पूना क्लब आणि सार्क क्रिकेट अकादमी संघांनी दमदार कामगिरी करत आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला. पूना क्लबने आर्यन्स क्रिकेट अकादमीवर१०४ धावांनी, तर सार्क क्रिकेट अकादमीने द क्रिकेट क्लब ऑफ रोहित संघावर९० धावांनीविजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली.

वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात समर्थ जाधवने अष्टपैलू कामगिरी करत पूना क्लबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आक्रमक फलंदाजी करत

१२३ धावांची शतकी खेळीकेली. त्यानंतर गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी करत३ गडी बादकेले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पूना क्लबने आर्यन्स क्रिकेट अकादमीचा१०४ धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना पूना क्लबने ५० षटकांत ९ गडी गमावून २३१ धावा उभारल्या. समर्थ जाधवने अवघ्या १०० चेंडूंत १२३ धावा करताना १६ चौकार आणि ३ षटकार लगावले. ऋषिकेशने ११७ चेंडूंत ५४ धावांची संयमी खेळी करत त्याला चांगली साथ दिली. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार मारले. विहान ताकवलेने १५ धावांचे योगदान दिले.आर्यन्स क्रिकेट अकादमीकडून अरिहंतने ३८ धावांत ३ गडी, तर राजवीर होले आणि अर्णव आगासे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

विजयासाठी २३२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आर्यन्स क्रिकेट अकादमीचा डाव ३८.५ षटकांत १२७ धावांवर आटोपला. सिद्ध राठोडने ८९ चेंडूंत ७६ धावांची झुंजार खेळी केली. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. अर्णव आगासेने १० धावा केल्या.पूना क्लबकडून समर्थ जाधवने १५ धावांत ३ गडी, तर तुषार बांगर आणि स्वराज बनसोडे यांनी अनुक्रमे २-१९ आणि २-९ अशी गोलंदाजी केली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या समर्थ जाधवची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

सार्क क्रिकेट अकादमीचा ९० धावांनी विजय

दुसऱ्या सामन्यात कृष्णा राऊतच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर सार्क क्रिकेट अकादमीने द क्रिकेट क्लब ऑफ रोहित संघाचा ९० धावांनी पराभव केला. कृष्णा राऊतने अवघ्या ९ धावांत ४ गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. प्रथम फलंदाजी करताना सार्क क्रिकेट अकादमीने ४४.५ षटकांत सर्वबाद २२२ धावा केल्या. अवधूत कानडेने आक्रमक फलंदाजी करत ६१ चेंडूंत ७० धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार फटकावले. शिवराज नागवडेने ६२ चेंडूंत ३८ धावा करताना ५ चौकार मारले. अनिमेश दासने २३, तर आरुष पवारने नाबाद १४ धावा केल्या.

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

कृष्णा राऊतचे अवघ्या ९ धावांत ४ गडी

द क्रिकेट क्लब ऑफ रोहितकडून अथर्व बाडेने ३६ धावांत ३ गडी, तर ऋग्वेद काळेने ३९ धावांत २ गडी बाद केले.विजयासाठी २२३ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या द क्रिकेट क्लब ऑफ रोहितचा डाव ४२.२ षटकांत १३२ धावांवर संपुष्टात आला. सागर पाबळेने १३४ चेंडूंत ७९ धावांची झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. त्याने १२ चौकार लगावले. रितम सेनने १७ धावा केल्या.मात्र, सार्क क्रिकेट अकादमीच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. कृष्णा राऊतने अवघ्या ९ धावांत ४ गडी बाद केले, तर शिवराज नागवडेने ३० धावांत ३ गडी टिपले. कृष्णा राऊतच्या भेदक गोलंदाजीमुळे सार्क क्रिकेट अकादमीने सामना ९० धावांनी जिंकला. त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Web Title: Dsp cricket league samarth make century and 3 wickets poona club won the match pune sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • cricket league
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
1

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
2

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार
3

Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार

Cricket Breaking: पुण्यात कॉर्पोरेट टी-२० चा थरार! चित्तरंजन रे अन् वैभव लवांडेची आक्रमक फटकेबाजी
4

Cricket Breaking: पुण्यात कॉर्पोरेट टी-२० चा थरार! चित्तरंजन रे अन् वैभव लवांडेची आक्रमक फटकेबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.