चित्तरंजन रेचेचे शतक (फोटो- सोशल मिडिया)
सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या सामन्यात गट्स अँड ग्लोरी संघाने कौशल असबे याच्या ७६ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर रियुनायटेड क्रिकेट क्लबचा १०९ धावांनी मोठा पराभव केला. गट्स अँड ग्लोरी संघाने विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात रियुनायटेड क्रिकेट क्लबचा संपूर्ण संघ अवघ्या ८५ धावांमध्ये गारद झाला. रियुनायटेडच्या करण जगताप याने ३९ धावांत ५ गडी बाद करत केलेली प्रभावी गोलंदाजी अखेर व्यर्थ ठरली.
श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?
दुसऱ्या सामन्यात ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने जीएसके क्रिकेट क्लबचा २९२ धावांच्या विक्रमी फरकाने एकतर्फी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ब्रेव्हहार्टच्या चित्तरंजन रे याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ५२ चेंडूंत ११ चौकार व १४ षटकारांच्या मदतीने तब्बल १४५ धावांची वादळी खेळी केली. त्याला चेतन खोपडे (नाबाद ७७ धावा) आणि जय ढोले (नाबाद ५० धावा) यांनी अर्धशतकी साथ दिल्याने संघाने ३०९ धावांचा विशाल डोंगर उभारला. या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना जीएसके क्रिकेट क्लबचा डाव अवघ्या ११७ धावांवर आटोपला.
DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा
दिवसातील आणखी एका लढतीत सेरेन स्ट्रायकर्स संघाने सुशिल जाधव स्पोर्ट्स फाऊंडेशन (एसजेएसएफ) मेन्स संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. सेरेन स्ट्रायकर्सच्या गणेश नागवणे याने केलेल्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर रोखण्यात यश आले, ज्याच्या जोरावर संघाने हा विजय नोंदवला.






