Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात थरार! चित्तरंजनने ठोकल्या 52 मध्ये 145 रन्स; स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ संघाचा विजय

Cricket: दिवसातील आणखी एका लढतीत सेरेन स्ट्रायकर्स संघाने सुशिल जाधव स्पोर्ट्स फाऊंडेशन (एसजेएसएफ) मेन्स संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2026 | 05:07 PM
कौशल असबे आणि गणेश नागवणे यांचीही उत्कृष्ट कामगिरी

कौशल असबे आणि गणेश नागवणे यांचीही उत्कृष्ट कामगिरी

Follow Us
Follow Us:
  • चित्तरंजन रेचेच्या झंझावाती शतकाने पुणेकर थक्क
  • ब्रेव्हहार्ट, सेरेन स्ट्रायकर्सचा दणदणीत विजय
  • कौशल असबे आणि गणेश नागवणे यांचीही उत्कृष्ट कामगिरी
  • सहाव्या ‘स्पार्टन मान्सून लीग’चे पुणे  शहरात भव्य आयोजन 
पुणे/Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब, पुणे यांच्या वतीने आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सून लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लब, गट्स अँड ग्लोरी आणि सेरेन स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी आगेकूच कायम ठेवली.

सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या सामन्यात गट्स अँड ग्लोरी संघाने कौशल असबे याच्या ७६ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर रियुनायटेड क्रिकेट क्लबचा १०९ धावांनी मोठा पराभव केला. गट्स अँड ग्लोरी संघाने विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात रियुनायटेड क्रिकेट क्लबचा संपूर्ण संघ अवघ्या ८५ धावांमध्ये गारद झाला. रियुनायटेडच्या करण जगताप याने ३९ धावांत ५ गडी बाद करत केलेली प्रभावी गोलंदाजी अखेर व्यर्थ ठरली.

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?

चित्तरंजन रेचे ५२ चेंडूंत १४५ धावांचे वादळ

दुसऱ्या सामन्यात ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने जीएसके क्रिकेट क्लबचा २९२ धावांच्या विक्रमी फरकाने एकतर्फी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ब्रेव्हहार्टच्या चित्तरंजन रे याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ५२ चेंडूंत ११ चौकार व १४ षटकारांच्या मदतीने तब्बल १४५ धावांची वादळी खेळी केली. त्याला चेतन खोपडे (नाबाद ७७ धावा) आणि जय ढोले (नाबाद ५० धावा) यांनी अर्धशतकी साथ दिल्याने संघाने ३०९ धावांचा विशाल डोंगर उभारला. या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना जीएसके क्रिकेट क्लबचा डाव अवघ्या ११७ धावांवर आटोपला.

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

सेरेन स्ट्रायकर्सचा सहज विजय

दिवसातील आणखी एका लढतीत सेरेन स्ट्रायकर्स संघाने सुशिल जाधव स्पोर्ट्स फाऊंडेशन (एसजेएसएफ) मेन्स संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. सेरेन स्ट्रायकर्सच्या गणेश नागवणे याने केलेल्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर रोखण्यात यश आले, ज्याच्या जोरावर संघाने हा विजय नोंदवला.

Web Title: Spartan monsoon league chittranjan reche century pune cricket league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Sports News:  भारतातील शालेय क्रीडेला टेक्नॉलॉजीची साथ! कबुनीचा 400 शाळा जोडण्याचा मोठा प्लॅन
1

Sports News: भारतातील शालेय क्रीडेला टेक्नॉलॉजीची साथ! कबुनीचा 400 शाळा जोडण्याचा मोठा प्लॅन

IND vs PAK Hockey: कमाल! हॉकीच्या मैदानात भारताच्या मुलींनी पाकिस्तानचे वाजवले तीन तेरा, Pakistan ची लज्जास्पद कामगिरी
2

IND vs PAK Hockey: कमाल! हॉकीच्या मैदानात भारताच्या मुलींनी पाकिस्तानचे वाजवले तीन तेरा, Pakistan ची लज्जास्पद कामगिरी

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम
3

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?
4

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.