Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK Hockey: कमाल! हॉकीच्या मैदानात भारताच्या मुलींनी पाकिस्तानचे वाजवले तीन तेरा, Pakistan ची लज्जास्पद कामगिरी

IND vs PAK Hockey: भारतीय महिला हॉकी संघाने ज्युनियर आशिया कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताने पाकिस्तानचा 19 गोलने पराभव केला. पाकिस्तानचा लज्जास्पद पराभव झाला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 10, 2026 | 02:15 PM
भारतीय महिला हॉकी संघाची कमाल (फोटो सौजन्य - X.com)

भारतीय महिला हॉकी संघाची कमाल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय महिला हॉकी संघाने पाकिस्तान संघाची उडवली दाणादाण 
  • १९ गोल्स करत केला पाकिस्तानी महिला हॉकी संघाचा पराभव 
  • पाकिस्तानची हॉकीत लज्जास्पद कामगिरी 
IND vs PAK Hockey: भारत आणि पाकिस्तान हा सर्व पातळीवर युद्धाचा विषय मानला जातो. केवळ क्रिकेट या खेळातच नाही तर सर्वच खेळांमध्ये पाकिस्तानच्या संघाला मात देण्यासाठी भारतीय खेळाडू तयार असतात आणि आता महिला ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा एकतर्फी सामन्यात पराभव केला आहे. पाकिस्तान महिला हॉकी संघाने अत्यंत निराशजनक आणि लज्जास्पद कामगिरी केल्याचे दिसून आले. 

चीनमधील मोकी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. भारताने हा सामना 19-0 अशा मोठ्या फरकाने जिंकला. या महिला ज्युनियर आशिया कपमधील कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह संघाने उपांत्य फेरी गाठली असून, तेथे त्याचा सामना दक्षिण कोरिया किंवा मलेशियाशी होणार आहे.

Hockey World Cup 2026: ‘करो या मरो’च्या लढतीत India फेल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-0 ड्रॉ, वर्ल्ड कपमधून बाहेर

भारताने ७व्या मिनिटापासून गोलचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली

भारताकडून सामन्यातील पहिला गोल 7व्या मिनिटाला झाला. हा गोल पूजा साहूने पेनल्टी कॉर्नरवर केला. पहिल्या क्वार्टरमध्ये पाच गोल झाले आणि भारताने फक्त दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने चांगला खेळ केला पण यावेळीही भारताने तीन गोल केले. शेवटच्या क्वार्टरमध्ये सर्वाधिक 6 गोल झाले. अशा प्रकारे भारताने सामन्यात एकूण 19 गोल केले.

पूजा मलिकने संघासाठी हॅट्ट्रिक गोल नोंदवला

या सामन्यात भारतासाठी 13 खेळाडूंनी गोल केले. पूजा मलिकने २७व्या, ४९व्या आणि ५१व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तर रोशनी, सानिका चंद्रकांत माने, मधु सिदार आणि सुप्रिया यांनी प्रत्येकी दोन गोल केले. पूजा साहू व्यतिरिक्त तनुश्री दिनेश कडू, सुखवीर कौर, गीता यादव, तनुजा टोप्पो, पूर्णिमा यादव, कृष्णा शर्मा आणि बिनिमा धन यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

भारत दोन वेळा या स्पर्धेचा गतविजेता आहे

गतविजेत्या भारताने महिला ज्युनियर हॉकी आशिया चषक 2026 मध्ये एकही सामना गमावलेला नाही. एलिट पूल फेरीत भारताचा चीनसोबतचा सामना गोलरहित बरोबरीत सुटला. याशिवाय जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवले. महिला ज्युनियर आशिया चषक 1992 मध्ये सुरू झाला. 2015 पर्यंत चीन आणि दक्षिण कोरियाचा दबदबा होता. गेल्या दोन स्पर्धांमध्ये भारताने दक्षिण कोरिया आणि चीनला पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे.

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…

Web Title: Ind vs pak hockey pakistan lost in womens junior asia cup quarter final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Hockey
  • Hockey Team India
  • Sports News

संबंधित बातम्या

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम
1

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?
2

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स
3

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…
4

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.