
श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची तुफानी सुरुवात
पॉवर प्लेमध्ये केली 100 रन्सची पार्टनरशिप
SRH Vs PBKS Tata IPL 2026 Live Updates : आयपीएलच्या महासंग्रामात आज पंजाब किंग्ज अन् सनरायझर्स हैद्राबाद आमनेसामने आले आहेत. न्यू चंदीगडमध्ये हा सामना सुरू आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र एसआरएचच्या सलामीच्या जोडीने हा निर्णय चुकीचा ठरवला. अभिषेक शर्माने खणखणीत अर्धशतक ठोकले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी हैदराबादच्या संघाकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा आले. दोन्ही फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये 100 रन्सची पार्टनरशिप केली. अभिषेक शर्माने वादळी खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेक शर्मानी 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोन्ही बाजूने फटकेबाजी होत असताना, बॉल कुठे टाकायचा ते गोलंदाजांना कळत नव्हते. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 74 रन्स केल्या. तर ट्रेविस हेड 38 रन्स करून आउट झाला. अभिषेक शर्माने पंजाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले.
Match 17. WICKET! 8.3: Abhishek Sharma 74(28) ct Arshdeep Singh b Shashank Singh, Sunrisers Hyderabad 122/2 https://t.co/DUNkQi9YaV #TATAIPL | #PBKSvSRH — IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026
पंजाब किंग्जची गोलंदाजी
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजांना एकही विकेट मिळू दिली नाही. प्रमुख गोलंदाजांना एकही विकेट न मिळाल्यामुळे श्रेयस अय्यरने मिडियम पेसर असलेल्या शशांक सिंहला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. त्याने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची विकेट पटकावली आणि एसआरएचच्या डावाला ब्रेक लावला.
काय आहे पीच रिपोर्ट?
आजचा सामना चंदीगडमध्ये होत आहे. पंजाब किंग्जचे हे होम ग्राऊंड आहे. आजची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी संतुलित असण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. काही ओव्हर्सनंतर फलंदाजी करणे देखील या ठिकाणी सोपे होऊ शकते. आज येथील हवामान देखील स्वच्छ आणि मोकळे पाहायला मिळणार आहे. केवळ 2 ते 3 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यामुळे आजच्या सामन्यावर काही परिणाम पाहायला मिळणार नाही, असे म्हंटले जात आहे.
SRH Vs PBKS: पंजाबने टॉस जिंकला अन्…; चंदीगडच्या पीचवर कोणाची जादू? पहा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा
एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा
पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंह, मार्को यानसन, जेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल,