श्रीलंकेचा सुपर ४ मध्ये प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हाँगकाँग संघाने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या. हाँगकाँगकडून निखत खानने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने फक्त ३८ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली. अंशुमन रथनेही ४८ धावांची खेळी केली. हाँगकाँगने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात संथ झाली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेने फक्त ३५ धावा केल्या. यादरम्यान, त्यांनी एक विकेटही गमावली. अखेर निसांकाच्या धुवाधार खेळीने श्रीलंकेने या मॅचवर वर्चस्व मिळवले
Asia cup 2025 : हाँगकाँगचे श्रीलंकेसमोर 150 धावांचे टार्गेट; निजाकत खानचे शानदार अर्धशतक
हाँगकाँग संघाची खेळी
अनुभवी निजाकत खान (नाबाद ५२) याने केलेल्या दमदार अर्धशतकामुळे आणि अंशुमन रथसोबत केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीमुळे, सोमवारी आशिया कपच्या ग्रुप बी सामन्यात हाँगकाँगने श्रीलंकेविरुद्ध ४ बाद १४९ धावांची स्पर्धात्मक धावसंख्या उभारली. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर, हाँगकाँगच्या डावातील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे निजाकत (३८ चेंडू) आणि रथ (४८ धावा, ४६ चेंडू) यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी. आशिया कपच्या टी२० टप्प्यात अर्धशतक झळकावणारा निजाकत हा हाँगकाँगचा दुसरा फलंदाज ठरला.
या जोडीने अनुभवी श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या दबावाला बळी न पडता मैदानावर काही अचूक फटके मारले. रथने मैदानाच्या दोन्ही बाजूंनी फटके मारले आणि त्याचा इनसाइड आउट कव्हर ड्राइव्ह ऑफ स्पिनर चरिथ असलंका पाहण्यासारखा होता. दुसरीकडे, निजाकतने विकेटसमोर ‘व्ही’ पसंत केला आणि लेग-स्पिनर वानिंदू हसरंगाच्या लाँग ऑनवर दोन चौकार आणि एक षटकार मारला. १७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ३३ धावांवर असताना यष्टीरक्षक कुसल मेंडिसने त्याचा झेल सोडला, त्यामुळे नशिबानेही त्याला साथ दिली.
श्रीलंका संघाची खेळी
श्रीलंकेची सुरूवात संथ झाली होती आणि पहिल्या काही ओव्हर्समध्ये त्यांनी २ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर नशिबानेही श्रीलंकेच्या संघाला साथ दिली. ११ कॅच ड्रॉप करण्यात आले आहेत आणि तिसऱ्या विकेट्ससाठी ११८ रन्सची वाट पहावी लागली. अत्यंत चांगली भागीदार मोडण्यात मुर्तझाला यश मिळाले आणि निसांका ६८ वर धावबाद अर्थात रनआऊट झाला. १५ व्या ओव्हरमध्ये हाँगकाँगला अपेक्षित यश मिळाले. तर लागोपाठ परेरादेखील LBW स्वरूपात माघारी परतला. हाच टर्निंग पॉईंट ठऱला असून श्रीलंकेला आपल्या हातात आलेली मॅच घालवावी लागली.
स्थान पक्के करण्यासाठी हाँगकाँगसमोर मात्र श्रीलंकेला नक्कीच आपला पूर्ण जोर लावावा लागला आहे. लागोपाठच्या विकेट्स घालवल्याने श्रीलंकेला हाँगकाँगसमोर झुकावे लागले. तिसऱ्या विकेट्सनंतर हाँगकाँगने जबरदस्त कमबॅक केल्याचे पहायला मिळाले. मेंडिसनेदेखील ५ रन्स बनवत आपली विकेट फेकली आणि श्रीलंकेचे जिंकण्याचे स्वप्नं धुळीला मिळाल्यासारखे वाटत होते. मात्र अखेर अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेला यश मिळाले
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
हाँगकाँग प्लेइंग इलेव्हन: झीशान अली (यष्टीरक्षक), अंशुमन रथ, बाबर हयात, निजाकत खान, शाहिद वासीफ, किंचिन शाह, यासीम मुर्तझा (कर्णधार), एजाज खान, आयुष शुक्ला, एहसान खान, अतिक इक्बाल
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिल मिश्रा, कुसल परेरा, चारिथ अस्लंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा