चारिथ असलंका आणि यासीम मुर्तझा(फोटो-सोशल मीडिया)
Hong Kong vs Sri Lanka : आशिया कपच्या या स्पर्धेतील आजचा दूसरा तर संपूर्ण स्पर्धेतील आठवा सामना श्रीलंका आणि हॉंगकॉंग यांच्यात खेळवण्यात येत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गामावणाऱ्या हाँगकाँग संघाने प्रथम फलंदाजी करत निजाकत खानच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर २० ओव्हरमध्ये ४ गडी गमावून १४९ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १५० धावा कराव्या लागणार आहेत. हाँगकाँगकडून निजाकत खानने नाबाद ५१ धावा केल्या आहेत. तर श्रीलंकेकडून दुशमंथा चमिराने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
सामान्यापूर्वी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा हा निर्णय तांच्याच अंगाशी आल्याचे दिसून आले. कारण, हाँगकाँगच्या सलामीवीरांनी ४१ धावांची शानदार भागीदारी करून संघाला आशादायक सुरुवात करून दिली. त्यानंतर झीशान अली २३ धावा करून बाद झाला. त्यानंतर बाबर हयात ४, यासीम मुर्तझा ५, निजाकत खान ५१ आणि एजाज खान ४ धावा करून नाबाद राहिले. श्रीलंकेकडून दुशमंथा चमिराने सर्वाधिक २ विकेट्स, वानिंदु हसरांगा आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
आशिया कप २०२५ मध्ये हाँगकाँग संघाने आपले लागोपाठ दोन सामने गमावले आहेत. पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध ९४ धावांनी गमवावा लागला होता. तर दूसरा सामन्यात बांगलादेशने ७ विकेट्सने हाँगकाँगवर विजय मिळवला होता. हाँगकाँगच्या फलंदाजांसमोर श्रीलंकेच्या गोलदाजांचे आव्हान असणार आहे. नुवान तुषारा आणि दुष्मंथा चामीरा ही वेगवान गोलंदाज जोडी हाँगकाँगला उद्ध्वस्त करण्यास सज्ज आहे. त्यामुळे हाँगकाँगच्या फलंदाजांना सावध राहावं लागणार आहे.
हेही वाचा : UAE vs OMAN : यजमान यूएईने नोंदवला पहिला विजय; ओमानचा 42 धावांनी केला पराभव
श्रीलंका संघ खालीलप्रमाणे
श्रीलंका : चारिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामडू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, वानिंदु हसरांगा, नुवान तुषारा, महेश थीकशना, दुशमंथा चमिरा, कमिंदू मेंडिस
हाँगकाँग संघ खालीलप्रमाणे
हाँगकाँग : झीशान अली (यष्टीरक्षक), अंशुमन रथ, बाबर हयात, निजाकत खान, कल्हान छल्लू, किंचिन शाह, यासीम मुर्तझा (कर्णधार), एजाज खान, एहसान खान, आयुष शुक्ला, अतिक इक्बाल
बातमी अपडेट होत आहे…