क्रॉस-कंट्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कारकर तसेच श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे कला शाखा विभागप्रमुख डॉ. रमेश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघांचा बक्षीस वितरण समारंभ श्रीमती उमा गुरव, श्रीमती गुरबन कौर, डॉ. राघव अष्टेकर, डॉ. सुदाम शेळके, डॉ. अभिजीत परसे आणि डॉ. अनिरुद्ध शर्मा यांच्या हस्ते पार पडला.
DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
यावेळी पुणे शहर क्रीडा समितीचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांतील क्रीडा अधिकारी, प्राध्यापक तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास डॉ. दीपक शेंडकर, डॉ. अय्याज शेख, डॉ. सुजित पवार, श्री विजय बेंगळ, डॉ. मनीषा कोंढरे, डॉ. पल्लवी तरडे, मानसी पाटणकर आणि जयश्री बागे यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ. सुदाम शेळके यांनी केले. डॉ. अनिरुद्ध शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार प्रदर्शनही केले.
मुले –
प्रथम क्रमांक : श्री शाहू मंदिर महाविद्यालय
द्वितीय क्रमांक : चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय
तृतीय क्रमांक : मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
मुली –
प्रथम क्रमांक : सेंट मिरज महाविद्यालय
द्वितीय क्रमांक : फर्ग्युसन महाविद्यालय
तृतीय क्रमांक : गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स
चौकट : वैयक्तिक निकाल
मुले –
प्रथम : करण अनिल भोये – सर परशुरामभाऊ कॉलेज – ३३.४४.०३
द्वितीय : तनिष विजय देसाई – संस्कार मंदिर महाविद्यालय – ३३.४९.७८
तृतीय : धोनी आनंद पासवान – नौरोजी वाडिया महाविद्यालय – ३५.२४.२४
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
मुली –
प्रथम : वैष्णवी सुनील खाडे – नेस वाडिया कॉलेज – ४४.१०.६२
द्वितीय : अवनी अमित आपटे – आबासाहेब गरवारे कॉलेज – ४७.१२.२४
तृतीय : नीतू सेन – चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन – ५२.०८.६२






