Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK च्या ऐतिहासिक पर्वाचा शेवट! ७ किताब जिंकून देणाऱ्या दिग्गजाची 18 वर्षांनंतर टीममधून एक्झिट

CSK Part ways with Stephen Fleming after 18 years: आयपीएल २०२७ हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संघामध्ये मोठा बदल होणार आहे. 18 वर्षांनंतर संघाला ७ ट्रॉफी जिंकवून देणारी दिग्गजाची टीममधून एक्झिट होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 13, 2026 | 01:21 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • CSK ला मोठा धक्का
  • 18 वर्षांनंतर मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची एक्झिट
  • खेळाडूपासून प्रशिक्षकापर्यंतचा एक अद्भुत प्रवास
आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझी व्यवस्थापन आणि फ्लेमिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या १८ वर्षांपासून स्टीफन फ्लेमिंग सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक आहेत. फ्लेमिंग यांनी दीर्घकाळ CSK चे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले, परंतु २०२६ च्या आयपीएल हंगामाला सुरुवात होऊन काही महिनेच झाले असताना त्यांनी संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता.

ICC Hall of Fame: भारतासाठी अभिमानाचा क्षण! सौरव गांगुली-अंजुम चोप्रा यांना क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान

सीएसके नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील

सीएसकेपासून वेगळे झाल्यानंतर फ्लेमिंग म्हणाले की, क्रीडाविश्वातील १८ वर्षे हा खूप मोठा काळ आहे आणि मी येथून अनेक आठवणी घेऊन जात आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबतचा माझा काळ हा माझ्या प्रशिक्षक कारकिर्दीतील सर्वात मोठा प्रवास राहिला आहे. आम्ही एकत्र मिळून जे काही मिळवले आहे, त्याचा मला अभिमान आहे. आम्ही एकत्र अविस्मरणीय विजय साजरे केले, कठीण प्रसंगांना तोंड दिले आणि अशा आठवणी निर्माण केल्या ज्या माझ्यासोबत कायम राहतील. सीएसके माझ्या हृदयाच्या नेहमीच जवळ राहील आणि मी येत्या काळातही या संघाला प्रोत्साहन देत राहीन.

OFFICIAL ANNOUNCEMENT The Super Kings and Head Coach Stephen Fleming have mutually decided to part ways.
Together, we shared one of the most successful and enduring partnerships in IPL history. The legacy you’ve built will continue to inspire us.
With immense respect and… pic.twitter.com/qjvb4oZUuU — Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 13, 2026

खेळाडूपासून प्रशिक्षकापर्यंतचा एक अद्भुत प्रवास

आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ मध्ये स्टीफन फ्लेमिंग हे चेन्नई सुपर किंग्स संघात खेळाडू म्हणून सामील झाले. यानंतर २००९ साली त्यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. सीएसके आणि फ्लेमिंग गेल्या १७ वर्षांपासून एकत्र आहेत आणि या फ्रँचायझीने अनेक यश मिळवले आहेत. फ्लेमिंगच्या मार्गदर्शनाखाली सीएसकेने यशाची नवी उंची गाठली. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच आयपीएल ट्रॉफी आणि दोन वेळा चॅम्पियन्स लीग टी२० चे विजेतेपद पटकावले. एवढंच नाही तर, सीएसकेने विक्रमी १२ वेळा प्लेऑफमध्ये आणि १० वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सीएसकेची कामगिरी खराब

सीएसकेने (CSK) आयपीएलमध्ये शेवटची ट्रॉफी २०२३ मध्ये जिंकली होती. पण तेव्हापासून संघाची कामगिरी चांगली निराशाजनक राहीली. सीएसके संघ सलग तीन हंगामात प्लेऑफसाठी पात्रही ठरू शकला नाही. २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये संघाचा प्रवास गट फेरीतच थांबला. २०२४ मध्ये सीएसके पाचव्या स्थानावर राहिला, तर २०२५ मध्ये तो १० व्या स्थानावर तळाशी होता. याउलट, २०२६ च्या हंगामात संघाने आठव्या स्थानावर आपला प्रवास संपवला.

FIFA World Cup 2026 Semi Finals: ट्रॉफीच्या शर्यतीत आता फक्त ४ संघ! सेमिफायनलचा थरार रंगणार; पाहा संपूर्ण शेड्यूल

Web Title: Stephen fleming part ways after 18 years as csk head coach before ipl 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • CSK
  • IPL
  • MS Dhoni Captain
  • Stephen Fleming

संबंधित बातम्या

MS Dhoni Birthday: विजेचा वेग, पोलादी धैर्य, प्रत्येक आव्हान झाले नतमस्तक; तिकिट कलेक्टर धोनी ते सर्वश्रेष्ठ कर्णधार
1

MS Dhoni Birthday: विजेचा वेग, पोलादी धैर्य, प्रत्येक आव्हान झाले नतमस्तक; तिकिट कलेक्टर धोनी ते सर्वश्रेष्ठ कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.