Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

Shreyas Iyer Broke Ms Dhoni T20 Captaincy record Ind vs wi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने एक ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एम.एस. धोनीचा विक्रम मोडला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 12, 2026 | 05:49 PM
Shreyas Iyer Broke Ms Dhoni T20 Captaincy record

Shreyas Iyer Broke Ms Dhoni T20 Captaincy record

Follow Us
Follow Us:
  • अय्यरचा कॅप्टन्सीमध्ये जलवा
  • धोनीला टाकलं मागे
  • T20 मध्ये बनला नंबर-1

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू असून आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. भारताने दोन सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने एक सामना जिंकला आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा सामना ११ ऑक्टोबर रोजी इंदौरमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना १४ धावांनी जिंकला. या विजयासह, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीचा विक्रम मोडला.

Ranji Trophy 2026: कमबॅकचा आनंद अन्…! ;न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा ‘हा’ वाघ जखमी, अडचणी वाढणार?

श्रेयस अय्यरने एम.एस. धोनीचा विक्रम मोडला

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आपल्या नेतृत्वाखाली सर्वाधिक वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या संघांच्या कर्णधारांच्या यादीत श्रेयस अय्यरने आता अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघ आणि आयपीएलल या दोघांची एकूण ही आकडेवारी आहे. श्रेयसने १३३ टी-२० सामन्यांचे कर्णधारपद भूषवले असून, या काळात त्याच्या संघाने ३७ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत आता एम.एस. धोनी दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली संघाने ३६ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने एकूण ३३१ सामन्यांचे कर्णधारपद भूषवले आहे.

या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १९३ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून २९ वेळा संघाला २०० किंवा त्याहून अधिक धावांपर्यंत पोहोचवले आहे. फॅफ डु प्लेसिसने २७ वेळा संघाला २०० किंवा त्याहून अधिक धावांपर्यंत पोहोचवले आहे, तर रोहित शर्माने २५ वेळा संघाला २०० किंवा त्याहून अधिक धावांपर्यंत पोहोचवले आहे.

टी२० कर्णधार म्हणून सर्वाधिक २००+ धावा

  • ३७ वेळा – श्रेयस अय्यर (१३३ सामने)
  • ३६ वेळा – एम.एस. धोनी (३३१ सामने)
  • २९ वेळा – विराट कोहली (१९३ सामने)
  • २७ वेळा – फॅफ डु प्लेसिस (२३५ सामने)
  • २५ वेळा – रोहित शर्मा (२२५ सामने)

श्रेयस अय्यरचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड

श्रेयस अय्यर यावर्षी भारताचा कर्णधार झाला. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने आयर्लंडविरुद्धची पहिली मालिका गमावली. यानंतर, टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु, भारताने चमकदार कामगिरी केली. यानंतर, टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका जिंकली. त्यानंतर भारताने अफगाणिस्तानला ३-० ने पराभूत केले. यानंतर, भारताने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. आता, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

Web Title: Shreyas iyer breaks ms dhoni t20 captaincy record ind vs wi pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • MS Dhoni Captain
  • Shreyas Iyer
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?
1

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी
2

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?
3

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस
4

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.