Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका रात्रीत बनला सुपरस्टार! 24 तासात प्रफुल हिंगेचे 1 हजारावरून 4 लाखावर फॉलोअर्स, सोशल मीडिया Sensation

आपल्या दमदार गोलंदाजीमुळे प्रफुल्ल हिंगे रातोरात स्टार बनला आहे. अवघ्या २४ तासांत त्यांचे फॉलोअर्स १,००० वरून जवळपास ४,००,००० पर्यंत वाढले. एका रात्रीत प्रफुलच्या खेळीमुळे हे शक्य झाले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 14, 2026 | 04:52 PM
प्रफुल हिंगेच्या फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

प्रफुल हिंगेच्या फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • २४ तासाच प्रफुल हिंगेचे फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर वाढले
  • मॅचपूर्वी होते केवळ १ हजार फॉलोअर्स 
  • आता ४ लाखाच्या आसपास फॉलोअर्समध्ये वाढ 
प्रफुल्ल हिंगेने IPL च्या इतिहासात अशी कामगिरी केली, जी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मिचेल स्टार्क आणि डेल स्टेन यांसारख्या अनेक दिग्गजांनाही साधता आली नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या १९ वर्षांच्या इतिहासात आपल्या पहिल्याच षटकात तीन बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चार बळी घेतले, ज्यामुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला.

या कामगिरीमुळे मराठमोळा प्रफुल हिंगे हा रातोरात स्टार बनला. २४ तासांच्या आत, त्याचे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स १,००० वरून जवळपास ४,००,००० पर्यंत वाढले. प्रफुल्ल हिंगेला सोशल मीडिया स्टार बनण्यासाठी लागलेल्या २४ तासांचा आढावा घेऊया. प्रफुलने राजस्थान रॉयल्सच्या विरूद्ध केलेली कामगिरी याला कारणीभूत ठरली असून अचानक त्याच्या प्रसिद्धीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

सामन्यापूर्वी १,००० फॉलोअर्स होते

सोमवारी अर्थात १३ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान, नवज्योत सिंग सिद्धूने खुलासा केला की सामन्याच्या दिवशी सकाळी प्रफुल्लचे इंस्टाग्रामवर अंदाजे १,००० फॉलोअर्स होते. यावेळीच सिद्धूने आता एका रात्रीमध्ये त्याचे फॉलोअर्स वाढतील अशी भविष्यवाणीदेखील केली होती आणि अगदी तसेच झाले. प्रफुलच्या कमालीच्या कामगिरीमुळे इन्स्टाग्रामवर २४ तासात तुफान वेगाने त्याचे चाहते वाढले आहेत. 

Who Is Praful Hinge: SRH Vs RR मध्ये पदार्पणातच उडवली राजस्थान रॉयलची झोप, कोण आहे मराठमोळा प्रफुल हिंगे?

२४ तासांत जवळपास ४,००,००० फॉलोअर्स

आता, १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास, नवज्योत सिंग सिद्धू यांनी घोषित केलेल्या वेळेनंतर साधारण २४ तासांत, प्रफुल्ल हिंगे यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या जवळपास ४,००,००० वर पोहोचली आहे. प्रफुल्ल रातोरात सोशल मीडिया स्टार बनला आहे. अर्थात यामागे त्याची इतक्या वर्षाची मेहनत आहे आणि आयपीएल हा खेळाडूंसाठी असा प्लॅटफॉर्म आहे जिथून त्यांचे नशीब बदलते आणि त्यांच्या मेहनतीचे फळही मिळते. सनरायझर्स हैदराबादने प्रफुल हिंगेला केवळ ३० लाखात खरेदी केले होते. पण त्याने मिळालेल्या संधीचे सोनं करून दाखवलं आहे. 

हैदराबादने सामना जिंकला

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, हैदराबादने २० षटकांत ६ गडी गमावून २१६ धावा केल्या. कर्णधार इशान किशनने संघासाठी सर्वोच्च खेळी केली, त्याने ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूंमध्ये ९१ धावा केल्या.

त्यानंतर, धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला. डेनोव्हन फरेराने ६९ धावांची खेळी करून संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. मात्र, त्याच्या खेळीमुळे संघाला विजय मिळवता आला नाही. दरम्यान, प्रफुल्ल हिंगे आणि शकिब हुसैन यांनी प्रत्येकी चार बळी घेत हैदराबादच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Praful Hinge चा RR ला ‘मराठमोळा’ हिसका! SRH ने 5 व्या विजयापासून रोखलं, 57 रन्सने केला पराभव

Web Title: Sunrisers hyderabad superstar praful hinge instagram followers reached near 4 lakhs from 1 thousand in 24 hours after ipl 2026 srh vs rr match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान
1

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम
2

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?
3

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?
4

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.