Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली

Sports News: सामना हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर सुप्रीम एसेसने जोरदार पुनरागमन केले. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये एसेसच्या श्री शिरोडकरने स्ट्रायकर्सच्या संजीव आगाशेचा ३-२ असा पराभव करत संघाचे आव्हान कायम ठेवले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 24, 2026 | 09:31 PM
PYC Snooker and Billiards League

PYC Snooker and Billiards League

Follow Us
Follow Us:
  • अंतिम लढतीत स्कायलाईन स्ट्रायकर्सवर ४-३ अशी मात
  • रोमहर्षक सामन्यात एसेसने राखले विजेतेपद
  • सुप्रीम एसेसचे सलग दुसऱ्यांदा पीवायसी लीग विजेतेपद
पुणे: पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित (PYC) तिसऱ्या पीवायसी स्नूकर अँड बिलियर्ड्स लीग स्पर्धेत गतविजेत्या सुप्रीम एसेस संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत सुप्रीम एसेसने स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाचा ४-३ असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.पीवायसी हिंदू जिमखाना येथील स्नूकर अँड बिलियर्ड्स (Sports) विभागात झालेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर निर्णायक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत सुप्रीम एसेसने बाजी मारली.

अंतिम फेरीतील १५ रेड स्नूकर एकेरी सामन्यात सुप्रीम एसेसच्या निमिश कुलकर्णीने स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या स्वरूप कुलकर्णीचा ८०-६४ असा पराभव करत आपल्या संघाचे खाते उघडले. यानंतर ६ रेड स्नूकर दुहेरी सामन्यात स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या आनंद आपटे व अनिकेत शिंदे यांनी सुप्रीम एसेसच्या अशोक शेट्टी व अरुण बर्वे यांचा ५३-२९ असा पराभव करत सामना बरोबरीत आणला.

बिलियर्ड्समध्ये एसेसची आघाडी

बिलियर्ड्सच्या सामन्यात सुप्रीम एसेसच्या रोहित सुगंधीने स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या अमित भडभडेचा १००-९७ असा पराभव करत एसेसला पुन्हा आघाडी मिळवून दिली.त्यानंतर ६ रेड स्नूकर एकेरी सामन्यात स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या आदित्य देशपांडेने सुप्रीम एसेसच्या कर्णा मेहताचा ४३-२४ असा पराभव केला. त्यामुळे सामन्यात पुन्हा चुरस निर्माण झाली. यानंतर ६ रेड स्नूकर दुहेरी प्रकारात स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या दिव्यांशु गोरेने विशाल भुरटच्या साथीत सुप्रीम एसेसच्या हर्षद शहा व नकुल पटेल यांचा ४२-२३ असा पराभव करत स्ट्रायकर्सला आघाडी मिळवून दिली.

Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..

शूटआऊटमध्ये एसेसचा निर्णायक विजय

सामना हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर सुप्रीम एसेसने जोरदार पुनरागमन केले. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये एसेसच्या श्री शिरोडकरने स्ट्रायकर्सच्या संजीव आगाशेचा ३-२ असा पराभव करत संघाचे आव्हान कायम ठेवले. यानंतर झालेल्या निर्णायक ब्लू बॉल शूटआऊटमध्ये सुप्रीम एसेसच्या प्रकाश वाळंबेने स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या आरिन माळीचा २-० असा पराभव केला. या विजयासह सुप्रीम एसेसने अंतिम सामना ४-३ असा जिंकत सलग दुसऱ्यांदा पीवायसी स्नूकर अँड बिलियर्ड्स लीगचे विजेतेपद मिळवले.

विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक

स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी क्लबच्या स्नूकर अँड बिलियर्ड्स विभागाचे सचिव नंदन डोंगरे, परंपरा बिर्याणीचे संचालक गुरु चिल्लाळ, तसेच आमोद प्रधान, शिरीष साठे, रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके

·         सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू : विशाल मल्होत्रा

·         सर्वाधिक आश्वासक खेळाडू : रोहित सुगंधी

·         सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू : आदित्य देशपांडे

·         सर्वोच्च ब्रेक – बिलियर्ड्स : राजवर्धन जोशी

·         सर्वोच्च ब्रेक – स्नूकर : निमिश कुलकर्णी

·         सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्स खेळाडू : राजवर्धन जोशी

·         सर्वोत्कृष्ट स्नूकर खेळाडू : निमिश कुलकर्णी

·         सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू : अरुण बर्वे

·         सर्वोत्कृष्ट दुहेरी खेळाडू : गुरु चिल्लाळ व शक्ती चितळे

·         सर्वोत्कृष्ट ब्लू बॉल खेळाडू : प्रकाश वाळंबे

·         सर्वोत्कृष्ट ब्लॅक बॉल खेळाडू : यश शहा

·         स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : आनंद आपटे

Web Title: Supreme aces win second consecutive league title in pyc snooker league sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • pune news
  • PYC Hindu Gymkhana Club
  • Sports News

संबंधित बातम्या

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
1

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
2

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
3

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद
4

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.