Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

Swimming: संगीता राऊतजी म्हणाल्या, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना केवळ विजयाचा आनंदच मिळाला नाही, तर आयुष्यातील आव्हानांवर मात करण्याचा आत्मविश्वासही मिळाला. कोणत्याही संकटाचा सामना करताना सातत्य, जिद्द आणि बांधिलकी महत्त्वाची असते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2026 | 04:48 PM
ध्रुव ग्लोबल स्कूलचा आशियात डंका

ध्रुव ग्लोबल स्कूलचा आशियात डंका

Follow Us
Follow Us:
  • ५८ विद्यार्थ्यांच्या २४ तास जलतरण मॅरेथॉनमध्ये विक्रम
  • आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
  • ध्रुव ग्लोबल स्कूलचा आशियात डंका
पुणे/Swmming: ‘सलग २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनमध्ये ५८ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवत ध्रुव ग्लोबल स्कूलने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमाची नोंद केली. ८ आणि ९ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना, शिस्त आणि जिद्दीचा प्रेरणादायी संदेश दिला.’ असे प्रतिपादन (Sports) आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षक डॉ. चित्रा जैन यांनी केले.

ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वतीने आयोजित २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी आणि अनिष्का मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. प्राचार्य संगीता राऊतजी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. क्रीडा समन्वयक गिरीश टोकसे आणि रोहित पाटील यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. तसेच जलतरण शिक्षक स्मिता काथवे, रुपाली अनप, विशाल नरवडे, उमा जोशी, अनिकेत सरदार आणि कपिलेश हारणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजन, प्रशिक्षण आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदविण्याची संधी मिळाली.

संगीता राऊतजी म्हणाल्या, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना केवळ विजयाचा आनंदच मिळाला नाही, तर आयुष्यातील आव्हानांवर मात करण्याचा आत्मविश्वासही मिळाला. कोणत्याही संकटाचा सामना करताना सातत्य, जिद्द आणि बांधिलकी महत्त्वाची असते, हा जीवनमंत्र विद्यार्थ्यांनी या अनुभवातून आत्मसात केला.

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

आरोग्य आणि अभ्यासाचा समतोल महत्त्वाचा

विद्यार्थ्यांचा दिवस खेळ, ध्यान आणि योगाने सुरू होतो. अभ्यासासोबत आरोग्याची काळजी घेणे आणि जीवनात समतोल राखणे महत्त्वाचे आहे. समर्पण, बांधिलकी आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही आव्हानावर मात करता येते. हाच समतोल ध्रुवच्या यशाचा आधार आहे. असे संगीता राऊतजी सांगितले.

“या ऐतिहासिक क्षणामागे प्रत्येक विद्यार्थ्याची मेहनत, प्रशिक्षकांचे समर्पण आणि संपूर्ण क्रीडा पथकाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक, प्रशिक्षक आणि आयोजकांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. सर्वांच्या एकजुटीमुळेच हा गौरवशाली क्षण साकार झाला असून, ही कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद आहे.”

– संगीता राऊतजी प्राचार्य ध्रुव ग्लोबल स्कूल

“सलग २४ तासांची जलतरण मॅरेथॉन पूर्ण करणे ही छोटी उपलब्धी नाही. त्यासाठी ताकद, सहनशक्ती आणि हार न मानण्याची वृत्ती आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी मेहनत, समर्पण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा विक्रम साध्य केला. या यशासाठी सर्व जलतरणपटू, प्रशिक्षक, शिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन,”

– डॉ. चित्रा जैन परीक्षक आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

India Record : ‘या’ 6 वर्षीय चिमुकलीचा विक्रम पाहिलात का? भल्याभल्यांनाही जमलं नाही ते तिने करून दाखवलं

जलतरण मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वांत मोठा अनुभव आहे. माझा स्लॉट दुपारी अडीच ते तीन असा होता. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे मला खूप छान वाटले. शिट्टी वाजेपर्यंत पोहत राहण्याची जिद्द मनात होती. हा अनुभव माझ्यासाठी कायम अविस्मरणीय राहील.

– भूमी पाटील विद्यार्थिनी (वर्ग चौथा)

Web Title: Dhruv global school enters asia book of records 24 hour swimming marathon featuring 8 students tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News
  • Swimming

संबंधित बातम्या

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार
1

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

पुण्यात महिला Cricket चा जलवा! स्वामिनी जेजूरकरची भेदक गोलंदाजी; वॉरीयर्स स्पोर्ट्‌स क्लबचा सलग चौथा विजय
3

पुण्यात महिला Cricket चा जलवा! स्वामिनी जेजूरकरची भेदक गोलंदाजी; वॉरीयर्स स्पोर्ट्‌स क्लबचा सलग चौथा विजय

१९ बॉल्समध्ये ४६ रन्स अन्…! संदीप देवलच्या अष्टपैलू जोरावर युबीएसचा बार्कलेजवर दणदणीत विजय
4

१९ बॉल्समध्ये ४६ रन्स अन्…! संदीप देवलच्या अष्टपैलू जोरावर युबीएसचा बार्कलेजवर दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.