Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court on Hasin Jahan: सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमीच्या पत्नीला फटकारले, हसीन जहाँ मोठ्या अडचणीत

मोहम्मद शमी सध्या भारतीय संघात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्याची पत्नी हसीन जहाँ यांना प्रश्न विचारले आहेत. शमी सध्या त्याच्या पत्नीला ₹४ लाख मासिक भत्ता देतो.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 07, 2025 | 07:05 PM
सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमीच्या पत्नीला फटकारले (Photo Credit - X)

सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमीच्या पत्नीला फटकारले (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोहम्मद शमीला दिलासा
  • पत्नी हसीन जहाँला सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल!
  • जाणून घ्या काय आहे प्रकरण

Mohammed Shami Supreme Court Case: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या टीम इंडियापासून दूर असून पुनरागमनासाठी संघर्ष करत आहे. दरम्यान, तो त्याची पत्नी हसीन जहाँ पासून वेगळा राहत असून, हसीन जहाँने पोटगीत वाढ करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हसीन जहाँला थेट सवाल विचारत शमीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.

Mohammed Shami’s wife moves Supreme Court for ₹10 lakh monthly maintenance Read here: https://t.co/gfJsSIWYPG pic.twitter.com/LZnmScb6a3 — Bar and Bench (@barandbench) November 7, 2025

पोटगी वाढवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा सवाल

हसीन जहाँने पोटगीत वाढ करण्याची याचिका दाखल केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने यावर नोटीस बजावली आहे. यापूर्वी, कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला हसीन जहाँला दरमहा १.५ लाख रुपये आणि मुलीला २.५ लाख रुपये असे एकूण ४ लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले होते.

यावर हसीन जहाँने शमीचे उत्पन्न आणि जीवनशैली लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचा युक्तिवाद केला आणि १० लाख रुपये पोटगीची मागणी केली. परंतु, सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विचारले “दरमहा ४ लाख रुपये आधीच खूप जास्त नाही का?” खंडपीठाने आता शमी आणि पश्चिम बंगाल सरकारकडून चार आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे.

‘फक्त नाटक आहेत…’ मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अजित आगरकर आणि बीसीसीआयला यांना फटकारले

शमीवर हसीन जहाँकडून गंभीर आरोप

मोहम्मद शमी आणि मॉडेल हसीन जहाँ यांनी २०१४ मध्ये लग्न केले होते, मात्र २०१८ मध्ये दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले. नुकतेच, हसीन जहाँने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये शमीवर गंभीर आरोप केले आहेत. हसीन जहाँने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचे नाते मजबूत राहील, इंशाअल्लाह.

आता हे नाते कोणत्या प्रकारची ताकद असेल हे ठरवायचे आहे.” ती पुढे म्हणते, “आम्ही सात वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहोत. यातून तुम्हाला काय मिळाले? तुम्ही चारित्र्यहीन, लोभी आणि स्वार्थी असल्याने तुम्ही तुमचे स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे.” शमीने शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतासाठी खेळला होता.

आर अश्विनने मोहम्मद शमीबद्दल बीसीसीआयला सल्ला दिला, म्हणाला – मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने…

Web Title: Supreme court reprimands mohammed shamis wife hasin jahan in big trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Mohammed Shami
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs PAK : आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार धमाकेदार सामना, ‘नो हँडशेक’ वाद कायम राहणार का?
1

IND vs PAK : आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार धमाकेदार सामना, ‘नो हँडशेक’ वाद कायम राहणार का?

भारताकडून झालेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत पराभवाचे दुःख एलिसा हिलीला सोसेणा! सोडले मौन, वाचा सविस्तर
2

भारताकडून झालेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत पराभवाचे दुःख एलिसा हिलीला सोसेणा! सोडले मौन, वाचा सविस्तर

‘फक्त नाटक आहेत…’ मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अजित आगरकर आणि बीसीसीआयला यांना फटकारले
3

‘फक्त नाटक आहेत…’ मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अजित आगरकर आणि बीसीसीआयला यांना फटकारले

IND vs AUS : शिवम दुबेने सांगितला मास्टर प्लान! ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कसं फसवलं? खेळाडूने केला खुलासा
4

IND vs AUS : शिवम दुबेने सांगितला मास्टर प्लान! ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कसं फसवलं? खेळाडूने केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.