
IND vs SA 2nd T20: Team not worried about Surya-Gil's form! But, criticism from many veterans started...; Read in detail
IND vs SA 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना काळ चंदीगडमध्ये खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाला 51 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, हा त्यांचा धावांच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा T20I पराभव ठरला आहे. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांच्या फॉर्मबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
या मालिकेत शुभमन गिल पहिल्या सामन्यात ४ तर दुसऱ्या सामन्यात ० धावा केल्या होत्या, तर सूर्यकुमार कटकमध्ये १२ धावा तर चांदीगडमध्ये त्याने केवळ ५ धावा केल्या होत्या. दोघेही कटकमधील विजय आणि चंदीगडमधील पराभव दोन्हीमध्ये सामन्यात अपयशी ठरले आहेत. ज्यामुळे चाहत्यांसह अनेक प्रमुख खेळाडू या टॉप-ऑर्डर फलंदाजांवर टीका करताना दिसत आहेत.
कर्णधार आणि उपकर्णधाराने कटक आणि चंदीगडमध्ये दोन्ही डावांमध्ये मिळून २१ धावा केल्या आणि चंदीगडमध्ये संघाला त्याचे परिणाम पाहावे लागेल. यावर आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठाण याने देखील म्हटले की, “कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनत आहे. दक्षिण आफ्रिकेने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. क्विंटन डी कॉकनेही फॉर्म परत मिळवला आहे, जी आता दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी बातमी आहे.”
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या शुभमन गिलसाठी, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अद्याप छाप पडता आलेली नाही. गिलने दीड वर्षापूर्वी जुलै २०२४ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते. त्याच्या शेवटच्या पाच डावांमध्ये, तीन वेळा त्याचा धावसंख्या ५ च्या पुढे देखील जाऊ शकली नाही.
कर्णधार सूर्यकुमार यादवने कटक आणि चंदीगडमध्ये मिळून एकूण १७ धावा केल्या हेत. सूर्याने कर्णधार म्हणून निश्चितच मालिका गमावलेली नसली तरी अर्धशतकाशिवाय सूर्याचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हा सलग २० वा डाव ठरला आहे.
दुसऱ्या सामन्यानंतर संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने जे सांगितले की, या फलंदाजांच्या कामगिरीतील कमतरता ही मोठी चिंता नसून ते लवकरच फॉर्ममध्ये परतू शकतात. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट म्हणाले की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान शुभमनने मानसिकदृष्ट्या निरोगी असल्याचे चांगले संकेत दिसून आले होते, त्यामुळे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या सुरुवातीच्या बादांवर मी जास्त लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. कटकमध्ये, आम्ही फलंदाजांना पॉवरप्लेमध्ये आक्रमण करण्यास सांगितले होते आणि दुसऱ्या सामन्यात, तो एका चांगल्या चेंडूने बाद झाला आणि जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता तेव्हा ते कोणासोबत देखील होऊ शकते.”