Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Krida Sankul: मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा; तीन ठिकाणी SVKM करणार विकास

Mumbai Krida Sankul: मुंबईतील ३ महत्त्वाच्या क्रीडा संकुलाचा विकास करण्यात येणार आहे आणि यासाठी आता SVKM विकास करण्यासाठी पुढे आले आहे. नक्की कसा असणार आराखडा?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 27, 2026 | 11:14 AM
मुंबईतील क्रीडा संकुलांचा होणार विकास

मुंबईतील क्रीडा संकुलांचा होणार विकास

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत क्रीडा सुविधांना आता मिळणार नवी दिशा 
  • SVKM करणार विकास, कसा आहे आराखडा 
  • जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण
Mumbai Krida Sankul: मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी क्रीडा सुविधांचा विकास आणि व्यवस्थापन करणार आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डन आणि अंधेरीतील डी.एन. नगर येथील सिमेंट गोडाऊन या तीन ठिकाणांचा त्यात समावेश असून, या जागांचे एकूण क्षेत्रफळ 14.11 एकर आहे.

या तिन्ही जागांची मालकी मुंबई महापालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (MHADA) कायम राहणार आहे. SVKMला या जागा मर्यादित कालावधीसाठी परवान्याने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जागांचे कायमस्वरूपी हस्तांतरण संस्थेकडे झालेले नसल्याचे SVKMने स्पष्ट केले आहे.

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

प्रकल्पनात काय असणार?

या प्रकल्पांतर्गत स्थानिक नागरिक, मुले आणि युवा खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, अॅथलेटिक्स, टेनिस, बास्केटबॉल, पिकलबॉल, स्केटिंग, स्क्वॅश तसेच इनडोअर जिम्नॅशियमसारख्या सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

या सुविधांच्या विकासासाठी लागणारा भांडवली खर्च, संचालन आणि देखभालीचा खर्च SVKM करणार आहे. अंधेरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त 40 ते 50 प्रमाणित प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी, समन्वयक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. SVKMच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या क्रीडा उपक्रमांमध्ये सध्या 148 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

निविदा प्रक्रियेनुसार देण्यात आले कंत्राट 

अंधेरीतील क्रीडा संकुल SVKMला थेट देण्यात आल्याचा दावा संस्थेने फेटाळला आहे. या प्रकल्पासाठी BMCने सप्टेंबर 2025मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. सात संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला, तर चार संस्थांचा अंतिम मूल्यांकनासाठी विचार करण्यात आला. SVKMने एकूण महसुलातील 50 टक्के हिस्सा देण्याची सर्वाधिक बोली सादर केली असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

दरम्यान, या तीन जागांचे एकत्रित क्षेत्रफळ 16 एकर नसून 14.11 एकर असल्याचेही SVKMने स्पष्ट केले आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे क्षेत्रफळ 11.57 एकर, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डनचे 0.92 एकर आणि डी.एन. नगरमधील जागेचे 1.62 एकर आहे.

अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार; कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी

काय म्हणाले अध्यक्ष

SVKMचे अध्यक्ष अमरीशभाई पटेल यांनी मुंबईत खेळाडूंना सातत्याने सराव आणि प्रशिक्षण घेता येईल, अशा दर्जेदार क्रीडा सुविधांची गरज अधोरेखित केली. ‘भारत 2036च्या ऑलिम्पिकचे तसेच इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर क्रीडा संस्कृतीही मजबूत करणे गरजेचे आहे. मुंबईतील तरुण खेळाडूंना चांगल्या सुविधा, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्यातून भविष्यातील विजेते घडू शकतात. याच उद्देशाने मुंबईतील एक लाख तरुणांपर्यंत जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे त्यांनी सांगितले.

SVKMच्या माहितीनुसार, संस्थेने आतापर्यंत एकात्मिक क्रीडा परिसंस्था विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. मुंबईतील तरुणांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

Web Title: Svkm to develop mumbai krida sankul andheri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई
1

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई

करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा
2

करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा

Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली
3

Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई
4

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.