Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathon: ९० किलोमीटरचे आव्हान पेलले, आता शंभराव्या मॅरेथॉनची तयारी! धाराशिवच्या सुपुत्राची प्रेरणादायी कामगिरी

Dharashiv Marathon Runner Dr Amar Bhandage 100 Marathons: धाराशिवचे डॉ. अमर भडंगे १५ वर्षांच्या प्रवासानंतर १०० वी मॅरेथॉन पूर्ण करणार आहेत. २२ नोव्हेंबरला मुंबईत त्यांच्या जिद्दीचा ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 21, 2026 | 04:15 PM
Dr Amar Bhandage 100 Marathons

Dr Amar Bhandage 100 Marathons

Follow Us
Follow Us:
  • १५ वर्षांचा संघर्ष, हजारो किलोमीटरची धाव
  • डॉ. अमर भडंगे यांची १०० मॅरेथॉनकडे दमदार वाटचाल
  • २२ नोव्हेंबरला पूर्ण करणार शंभरावी मॅरेथॉन
धाराशिव: जिद्द, चिकाटी, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचा प्रेरणादायी वस्तुपाठ जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. अमर भडंगे यांनी घालून दिला आहे. तब्बल १५ वर्षांच्या धावण्याच्या प्रवासात विविध प्रकारच्या १०० मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा त्यांनी गाठला आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे ते आपल्या शंभराव्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असून, त्यांच्या या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Dr Amar Bhandage 100 Marathons)

IND vs NZ: ना धोनी, ना गिलख्रिस्ट Rishabh Pant ठरला बॉस! एका खेळीत मोडले दोन रेकॉर्ड्स; WTC मध्येही रचला इतिहास

डॉ. भडंगे यांचा प्रेरणादायी प्रवास

धावण्याची सुरुवात केवळ आवड म्हणून करणाऱ्या डॉ. भडंगे यांनी पुढे धावण्यालाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. पहाटेचा नियमित सराव, हजारो किलोमीटरचे अंतर, शरीराचा थकवा, दुखापती, वेदना आणि अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हा प्रवास सातत्याने सुरू ठेवला. अनेकदा शरीराने विश्रांतीचे संकेत दिले; मात्र मनातील ध्येय आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने धावण्यास सुरुवात केली.

त्यांच्या १५ वर्षांच्या धावण्याच्या कारकिर्दीत तीन अल्ट्रा मॅरेथॉन, १० फुल मॅरेथॉन, २५ किलोमीटरच्या बीएनपी बोरिवली स्पर्धेत सात वेळा सहभाग, २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनच्या ७८ स्पर्धा आणि सुरुवातीच्या टप्प्यातील १० किलोमीटरच्या दोन पात्रता धावा अशा एकूण १०० स्पर्धांचा समावेश आहे.

९० किलोमीटरची ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ पूर्ण

या प्रवासातील सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली ९० किलोमीटरची ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ पूर्ण करण्याचा पराक्रम. जगातील अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये गणल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होऊन ती पूर्ण करणे ही त्यांच्या धावण्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे.

डॉ. भडंगे यांच्या मते, १०० मॅरेथॉनचा टप्पा हा केवळ वैयक्तिक यश नसून त्यामागे कुटुंबीयांचे प्रेम, मित्रपरिवाराची साथ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, सहकारी धावपटूंचे प्रोत्साहन आणि हितचिंतकांचे आशीर्वाद आहेत. धावण्याच्या निमित्ताने विविध शहरांमध्ये केलेले प्रवास, सहकारी धावपटूंसोबत धावलेले असंख्य किलोमीटर, एकत्रित सराव, गप्पा आणि स्पर्धांमधील अनुभव हा त्यांच्या आयुष्यातील अनमोल ठेवा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुरुवातीच्या धावण्यापासून ते दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटरच्या आव्हानात्मक स्पर्धेपर्यंत आणि आता शंभराव्या मॅरेथॉनपर्यंतच्या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.

शंभर मॅरेथॉन हा शेवट नव्हे, तर नव्या ध्येयांची सुरुवात

शंभर मॅरेथॉन पूर्ण करण्याचा टप्पा गाठल्यानंतरही डॉ. अमर भडंगे यांची धावण्याची जिद्द कायम आहे. आगामी काळात देशातील विविध शहरांसह परदेशातील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणारी त्यांची शंभरावी मॅरेथॉन ही केवळ एका आकड्याची पूर्तता नसून १५ वर्षांच्या अथक परिश्रमांची, संघर्षाची आणि अविरत ध्येयवेडाची गौरवशाली पावती ठरणार आहे.’स्माइल प्लीज’ हा संदेश देत स्वतःच्या चेहऱ्यावरील हास्य आणि मनातील जिद्द कायम ठेवणाऱ्या डॉ. अमर भडंगे यांचा हा प्रवास नवोदित धावपटूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर

Web Title: Dharashiv runner dr amar bhandage will run 100th marathon mumbai pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Marathon
  • Mumbai Marathon
  • Runner
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन
2

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान
3

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान

Football: फुटबॉल मैदानावर सडनडेथचा थरार! स्निग्मय पुणे एफसीचा ९-८ ने रोमांचक विजय
4

Football: फुटबॉल मैदानावर सडनडेथचा थरार! स्निग्मय पुणे एफसीचा ९-८ ने रोमांचक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.