
दीप्ती शर्माच्या नावे मोठा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
स्मृती मंधानानेही या सामन्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. तिने धडाकेबाज ६८ धावांची खेळी केली. मात्र दीप्ती शर्माच्या झंझावातामुळे पाकिस्तानची महिला टीम मैदानात टिकू शकली नाही आणि भारताने विश्वकपची दणदणीत सुरूवात केली असल्याचे दिसून आले. याशिवाय दीप्तीने वैयक्तिक रेकॉर्डही या सामन्यात केला.
INDW vs PAKW Live: टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी; पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
दीप्ती शर्माने ५ बळी घेतले
Deepti Sharma was a star. She changed the match with five wickets and a direct hit. What a performance! 🇮🇳 🌟🌟🌟🌟🌟
Incredible bowling figures. 4-0-10-5#INDvPAK pic.twitter.com/uHqUnAMJL1 — Rahul 🇮🇳 (@rahulbbabar) June 14, 2026
दीप्ती शर्माने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १० धावा देत ५ बळी घेतले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वीचा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर होता. तिने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावांत ५ बळी घेतले होते. महिला टी-२० विश्वचषकातील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. ५० षटकांच्या वर्ल्ड कपमध्येही मागच्या वर्षी दीप्ती शर्माने कमालीची कामगिरी केली होती. ऑल राऊंडर असणारी दीप्ती शर्मा ही भारताची शान आहे.
महिला टी-२० मध्ये सर्वाधिक बळी
दीप्ती शर्मा महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात यशस्वी गोलंदाजही ठरली आहे. भारतीय ऑफ-स्पिनरने आतापर्यंत १६६ बळी घेतले आहेत. दीप्तीने तिच्या कारकिर्दीत १४५ सामने खेळले आहेत. थायलंडच्या थिपाचा पुथावोंगने १६५ बळी घेतले आहेत. पूर्णवेळ संघातील गोलंदाजांमध्ये, ऑस्ट्रेलियाची मेगन शट १५२ बळींसह दीप्तीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महिला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी