Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs ZIM W: दीप्ती शर्माने रचला इतिहास, सचिनच्या क्लबमध्ये सहभागी; One Day मध्ये रेकॉर्ड करणारी पहिली महिला खेळाडू

IND W vs ZIM W: ज्येष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्माने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. हे दीप्तीचे दुसरे एकदिवसीय शतक होते.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 26, 2026 | 12:10 PM
दीप्ती शर्माने रचला इतिहास, ठरली पहिली महिला खेळाडू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

दीप्ती शर्माने रचला इतिहास, ठरली पहिली महिला खेळाडू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • दीप्ती शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या ५० षटकांच्या सामन्यात ६ गडी गमावून ३२८ धावांचा डोंगर उभा केला
  • रचला इतिहास, सचिनच्या क्लबमध्ये झाली सहभागी 
  • रेकॉर्ड करणारी ठरली पहिली महिला खेळाडू 
IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दीप्तीने आपल्या खेळीत १५ चौकारांसह ८६ चेंडूंमध्ये नाबाद १०६ धावा केल्या. हे दीप्तीचे दुसरे एकदिवसीय शतक होते. यासह, दीप्ती सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

IND Vs ZIM : नाद करायचा नाय! झिम्बाब्वेला लोळवत भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

दीप्ती शर्माचा खास रेकॉर्ड 

इतकेच नाही, तर या शतकासह दीप्ती शर्माने भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकर यांच्या एलिट क्लबमध्येही प्रवेश केला. खरे तर, एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० पेक्षा जास्त बळी आणि किमान दोन शतके झळकावणारी दीप्ती ही पुरुष आणि महिला मिळून केवळ तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. 

सचिनच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये १५४ बळी आणि ४९ शतके आहेत. दुसरीकडे, मनोज प्रभाकरच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये १५७ बळी आणि दोन शतके आहेत. दीप्तीच्या नावावर आता दोन शतकांसह १७१ एकदिवसीय बळी आहेत.

भारताने हा सामना १२१ धावांनी जिंकला

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने १२१ धावांनी विजय मिळवला. दीप्ती शर्मा व्यतिरिक्त, माजी कर्णधार हरमनप्रीत कौरनेही १२६ धावांची शानदार खेळी केली. हरमनप्रीतने या खेळीत १२६ चेंडूंचा सामना करत एकूण १५ चौकार मारले. दीप्ती आणि हरमनप्रीतच्या या शतकांमुळे भारतीय महिला संघाने निर्धारित ५० षटकांत ६ गडी गमावून ३२८ धावा केल्या.

प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेने भारताला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु आघाडीच्या फलंदाजांची फलंदाजी अयशस्वी ठरल्याने संपूर्ण संघ कोसळला. संपूर्ण झिम्बाब्वे संघ ४८.५ षटकांत २०७ धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान, भारतीय संघासाठी गोलंदाजी विभागात वैष्णवी शर्माने उत्कृष्ट कामगिरी केली. तिने १० षटकांत ३९ धावा देऊन ४ बळी घेतले. दीप्ती शर्माने 3 तर सायली सातघरे, जिंतीमणी कलिता आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला

💡

Frequently Asked Questions

  • Que: दीप्ती शर्माने कोणता रेकॉर्ड केला?

    Ans: दीप्ती शर्माने ६ क्रमांकावर शतक करण्याचा रेकॉर्ड केला आहे

  • Que: दीप्तीने झिम्बाम्ब्वेविरूद्ध किती धावा केल्या?

    Ans: दीप्तीने आपल्या खेळीत १५ चौकारांसह ८६ चेंडूंमध्ये नाबाद १०६ धावा केल्या

  • Que: दीप्तीने नेमका काय इतिहास रचला?

    Ans: दीप्ती सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे

Web Title: Ind w vs zim w deepti sharma made history became first female cricketer to score century at number 6 in an odi dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • cricket news
  • Deepti Sharma
  • IND VS ZIM

संबंधित बातम्या

NZ A vs IND A: बेईमानीचा कळस, देवदत्त पडिक्कल दुहेरी शतकाच्या उंंबरठ्यावर असताना चुकीचा निर्णय; अंपायरची मोठी चूक
1

NZ A vs IND A: बेईमानीचा कळस, देवदत्त पडिक्कल दुहेरी शतकाच्या उंंबरठ्यावर असताना चुकीचा निर्णय; अंपायरची मोठी चूक

IND Vs ZIM : नाद करायचा नाय! झिम्बाब्वेला लोळवत भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी
2

IND Vs ZIM : नाद करायचा नाय! झिम्बाब्वेला लोळवत भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला
3

Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला

IND W vs ZIM W Live: भारताच्या वाघिणींची डरकाळी! हरमनप्रीत-दिप्तीचा वादळी शतकी धमाका; झिम्बाब्वेसमोर ३२९ धावांचं आव्हान
4

IND W vs ZIM W Live: भारताच्या वाघिणींची डरकाळी! हरमनप्रीत-दिप्तीचा वादळी शतकी धमाका; झिम्बाब्वेसमोर ३२९ धावांचं आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.