Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs ZIM W Live: भारताच्या वाघिणींची डरकाळी! हरमनप्रीत-दिप्तीचा वादळी शतकी धमाका; झिम्बाब्वेसमोर ३२९ धावांचं आव्हान

IND W vs ZIM W 2nd ODI Live First Innings: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेला ३२९ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 25, 2026 | 06:12 PM
IND W vs ZIM W 2nd ODI Live

IND W vs ZIM W 2nd ODI Live

Follow Us
Follow Us:
  • हरमनप्रीत-दिप्तीने गाजवलं मैदान
  • झिम्बाब्वेसमोर भारताचं ३२९ धावांचं लक्ष्य
  • भारताची मालिका विजयाकडे वाटचाल
IND W vs ZIM W 2nd ODI Live: भारतीय महिला संघ आणि झिम्बाब्वे महिला संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जात आहे. हा सामना वडोदरा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सध्या सुरु आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत आणि दिप्ती शर्माच्या आक्रमक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून ३२८ धावा केल्या आहेत. स्फोटक फलंदाज हरमनप्रीतने खणखणीत शतक झळकावत १२१ चेंडूमध्ये १२६ धावा केल्या. तर, दिप्ती शर्मानेही शानदार शतक ठोकत ८६ चेंडूमध्ये १०६ धावा केल्या आहेत. (Harmanpreet Kaur)

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?

हरमनप्रीत- दिप्तीच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारत ३०० पार

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक ज प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्मृती मंधानाने सांगितले की, या सामन्यात क्रांती गौडला विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या जागी वैष्णवी शर्माला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. ती मंधाना आणि प्रतिका रावलने डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला. संघाची धावसंख्या १ असताना स्मृती शून्यावर बाद झाली. १९ धावांवर भारताने दुसरी विकेट गमावली. शफाली वर्मा ८ चेंडूंत ८ धावा करून बाद झाली. हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांनी आपली भागीदारी कायम ठेवत भारताला १०० धावांच्या पुढे नेले.

प्रतिकाच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला. प्रतिका ६७ चेंडूवर ६१ धावा करुन तंबूत परतली. न्याशा ग्वांनजुराने तिला बाद केले. त्यानंतर, तेजल हसनबीस ओएलिंडर चारेच्या चेंडूवर ३ धावा करुन स्वस्तात बाद झाली. यानंतर, हरमनप्रीत आणि दीप्ती शर्माने भारताचा डाव पुढे नेला. हरमनप्रीतने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले. तिने १२१ चेंडूमध्ये १२६ धावा केल्या. कर्णधारपद सोडल्यानंतर हरमनप्रीत कौरने आपले पहिले शतक झळकावले आहे. हरमनप्रीतच्या विकेटनंतर, दिप्तीने आक्रम खेळी सुरुच ठेवली. दिप्तीने देखील ८६ चेंडूमध्ये झंझावाती शतक ठोकले. ८६ चेंडूमध्ये १०६ धावा करत ती नाबाद राहिली. हरमनप्रीत आणि दिप्तीच्या उत्कृष्ट खेळीने भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताने ५० षटकांत ६ विकेट्स गमावून ३२८ धावांचा डोंगर उभा केला. झिम्बाब्वेकडून सिबांडाने २ विकेट्स घेतले. तर, माकुशा, माउंगा, ग्वांनुजुरा आणि चारे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

भारत मालिका जिंकण्याच्या तयारीत

भारताची पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर स्मृती मंधानाची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे. याआधी, टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० ने जिंकली. भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्बे ९ विकेट्सने धुव्वा उडवला होता. या विजयासह भारतीय संघतीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता संघाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारत: प्रतिका रावल, स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, तेजल हसबनीस, दिप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), वैष्णवी शर्मा, सायली सातघरे, श्री चरणी, जिंतामणी कलिता.

झिम्बाब्वे: मॉडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), लॉर्न फिरी, चिपो मुगेरी तिरिपानो, बिलव्ड बिजा, जोसफिन नकोमो (कर्णधार), न्याशा ग्वांनजुरा, चिएड्झा धुरुरु, मिचेल मावुंगा, नोमवेला सिबांडा, तेंडाई माकुशा, ओलिएंडर चारे.

थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत

Web Title: Ind w vs zim w 2nd odi live harmanpreet kaur 121 deepti century pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • Harmanpreet Kaur
  • IND VS ZIM
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला
1

Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला

भारताच्या लेकी जगात भारी! Pratika Rawal चे शतक अन् स्मृतीच्या क्लबमध्ये एन्ट्री; ‘हा’ रेकॉर्ड नावावर
2

भारताच्या लेकी जगात भारी! Pratika Rawal चे शतक अन् स्मृतीच्या क्लबमध्ये एन्ट्री; ‘हा’ रेकॉर्ड नावावर

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका
3

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर
4

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.