
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतामध्ये होणारा आगामी विश्वचषकासाठी क्रिकेट चाहते फारच उत्सुक आहेत. भारत आणि पाकिस्तान हा सामना भारतामध्ये नाही पण श्रीलंकेमध्ये खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. टी20 विश्वचषकाच्या तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. हे सामने पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांची आगामी विश्वचषकामध्ये गर्दी पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की. कारण तिकीटांची विक्रि सुरू झाल्यानंतर वेबसाइट क्रश झाल्यांची माहिती समोर आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आगामी सामना हा विश्वचषकाचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 15 जानेवारी रोजी होणार आहे. या तिकिटांची विक्री काल सुरू करण्यात आली होती. पण या तिकिटांची विक्री झालीच नाही कारण तिकिटांची विक्री सुरू केल्यानंतर लगेचच वेबसाइट BookMyShow क्रॅश झाली आणि चाहत्यांना तिकीटे घेता आली नाहीत. तिकिट विक्रीचा टप्पा कधीचा पार पडला होता. काल दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. या टप्प्यामध्ये कोलंबोमध्ये होणाऱ्या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी मोठी मागणी वाढली.
या टप्प्यात भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे, या सामन्याची तिकिटे समाविष्ट करण्यात आली होती, ज्यामुळे वेबसाइटवरील ट्रॅफिकमध्ये अचानक वाढ झाली. लॉग इन करणाऱ्या आणि एकाच वेळी तिकिटे खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या संख्येमुळे वेबसाइटचे सर्व्हर क्रॅश झाली आणि तिकीटे चाहत्यांना विकत घेता आली नाहीत.
सूत्रांनी सांगितले की, अनेक वापरकर्त्यांनी व्यवहार अयशस्वी झाल्याची आणि जास्त वाट पाहण्याच्या वेळेची तक्रार केली. एकाच वेळी येणाऱ्या विनंत्यांमुळे सर्व्हर क्रॅश झाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १५ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. भारताने आगामी टी-२० विश्वचषकासाठी आपला प्राथमिक संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना टी-२० विश्वचषकासाठी गट अ मध्ये अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्ससह स्थान देण्यात आले आहे.
Some moments don’t happen on screen. They happen in the stands.🏟️#ICCT20WorldCup2026 #Cricket #Stands #BookMyShow (1/2) pic.twitter.com/Utmy5ARSEd — BookMyShow (@bookmyshow) January 15, 2026
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग.
टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्ड चांगला नाही. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत एकूण आठ सामने खेळले गेले आहेत. भारताने एकतर्फी वर्चस्व राखले आहे, त्यापैकी सात सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानला फक्त एक सामना जिंकता आला.