Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 T20 World Cup 2026 : आज नामिबिया आणि भारत आमनेसामने! दिल्लीच्या  मैदानावर सूर्याआर्मीचा रेकॉर्ड काय सांगतो? वाचा सविस्तर 

आज टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारत आपला दुसरा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध खेळणार आहे.या मैदानावर भारतीय संघाची या मैदानावर कामगिरी कशी आहे? जाणून घेऊया.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 12, 2026 | 03:22 PM
T20 World Cup 2026: Namibia and India face off today! What does Surya Army's record say on the Delhi ground? Read in detail

T20 World Cup 2026: Namibia and India face off today! What does Surya Army's record say on the Delhi ground? Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NAM, T20 World Cup 2026: भारतीय संघ आज टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आपला दुसरा सामना खेळणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध भारत दूसरा सामना खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने या स्पर्धेची आमरिकेला पराभूत करत विजयी सुरुवात केली. आजच्या सामन्यात देखील भारतीय संघ तीच लय कायम ठेवून नामीबियाला देखील पराभूत करण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. दरम्यान, ज्या मैदानावर भारत आणि नामीबिया संघ आमनेसामने येणार आहेत, त्या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड कसा आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया,

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup 2026 : ‘भारताविरुद्ध वेगळ्या मानसिकतेने….’ पाकिस्तानच्या साहीबजादा फरहानचे विधान

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारताची कामगिरी

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाच्या टी२० आंतरराष्ट्रीय विक्रमावर नजर टाकल्यास सजमते की, संघाने आतापर्यंत तेथे चार सामने खेळले असून यापैकी भारताने दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने २०१७ मध्ये येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, ज्यामध्ये संघाने ५३ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला ७ विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता.

२०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात देखील भारताला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. या मैदानावर भारताचा शेवटचा सामना २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला गेला होता, जिथे ब्लु आर्मीने ८६ धावांनी दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे, या मैदानावर विजयाची टक्केवारी सुधारण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करणार आहे.

नाणेफेक आणि दव महत्त्वाची भूमिका बजावतात

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या संध्याकाळी सामन्यांमध्ये दव महत्त्वाची भूमिका बाजवणार आहे.  म्हणूनच टॉस जिंकणारे संघ नंतर फलंदाजी करताना दवाचा फायदा घेण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडत असतात. या मैदानावर आतापर्यंत एकूण ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ सामन्यात विजय मिळवला आहे.  तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ५ सामने जिंकले आहेत. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की या मैदानावर धावांचा पाठलाग करणे तुलनेने सोपे जाते.

हेही वाचा : NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

दोन्ही संभाव्य संघ खालीलप्रमाणे

भारतीय संभाव्य इलेव्हन :  संजू सॅमसन, इशान किशन, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग

नेपाळ संभाव्य इलेव्हन: लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, झेन ग्रीन (विकेटकीपर), डायलन लीचर, रुबेन ट्रम्पेलमन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शॉल्ट्झ, मॅक्स हेंगो

Web Title: T20 world cup 2026 what does indias record say on the delhi ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • IND vs NAM
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात
1

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान
2

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.