
T20 World Cup: After Shubman, is Suryakumar Yadav the next target? Gill dropped from the World Cup without being informed; is everything alright in the dressing room?
Shubman Gill dropped from the T20 World Cup squad : नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना दाट धुक्यामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमन गिलला टी-२० विश्वचषकसंघातून डच्चू देण्यात आला. त्याला संघातून वगळण्याचा निर्णय शनिवारी नव्हे तर बुधवारी घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
सूत्रानुसार, शुभमन गिलला संघातून वगळण्याचा निर्णय त्याच दिवशी घेण्यात आला होता, परंतु शनिवारी निवड समितीकडून जाहीर करण्यात आलेल्या संघात तो उघड करण्यात आला. तथापि, संघातून वगळण्यापूर्वी निवड समितीचे अध्यक्ष, कर्णधार सूर्यकुमार यादव किंवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गिलशी याबद्दल कही एक चर्चा केलेली नव्हती.
हेही वाचा : U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक
कर्णधार सूर्यकुमार यादवचा गेल्या वर्षभरातील खराब रेकॉर्ड राहिला आहे. तरी देखील तो संघात कायम आणि गिलला संघातून वगळण्यात आल्याने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे. गिलला संघातून वगळणे हे निराशाजनक मानले जात होते. वृत्तांनुसार, गिलच्या पायाच्या बोटाला दुखापत झाल्याचे वृत्त समोर येताच, संघ व्यवस्थापन त्याला डच्चू देण्यात येण्याच्या तयारीत आहेत असे दिसून आले. दुखापत असून देखील गिल अहमदाबादमध्ये खेळण्यास उत्सुक होता, कारण त्याची दुखापत गंभीर नव्हती आणि स्कॅनमध्ये ती किरकोळ दुखापत असल्याचे समोर आले होते. तथापि, संघ व्यवस्थापनाकडून गिलला वगळण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता.
शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्याही कामगिरीतील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. गिलने २०२५ मध्ये १५ डावांमध्ये २९१ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट १३७ पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार १९ डावांमध्ये २१८ धावाच करू शकला. तसेच त्याचा स्ट्राइक रेटही १२३.२ आहे, जो त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतरची त्याची सर्वात वाईट कामगिरी दर्शवतो.
या निर्णयामुळे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. इतर दोन फॉर्मेटमध्ये संघाचा कर्णधार असूनही, शुभमन गिलला वगळणे, संघ व्यवस्थापनाने एका मोठ्या निर्णयात कर्णधारावर प्रभाव पाडण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला हे सूचित करू शकते. गिलला वगळल्याने गंभीर आणि गिल यांच्यातील संबंध कायम राहतील का याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. विशेषतः ज्या अचानकपणे त्याला संघातून काढून टाकण्यात आले ते पाहता. असे देखील मानले जाते की जर सूर्यकुमारने त्याचा फॉर्म मिळवला नाही आणि धावा काढण्यात अपयशी ठरला तर त्याला देखील संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो.