Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अमेरिकेसमोर १६२ धावांचे आव्हान उभे केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 10:46 PM
T20 World Cup LIVE: The top order faltered at Wankhede! Suryakumar's innings saved face; India sets a target of 162 runs against USA.

T20 World Cup LIVE: The top order faltered at Wankhede! Suryakumar's innings saved face; India sets a target of 162 runs against USA.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs USA, T20 World Cup 2026 : आजपासून सुरू झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात  मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका आमनेसामने आले आहेत. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ९ गडी गमावून १६१ धावा केल्या आहेत. अमेरिकेला विजय मिळवण्यासाठी १६२ धावा कराव्या लागणार आहेत. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : WI vs SCO, ICC T20 World Cup 2026 : W,W,W…शेफर्डच्या हॅट-ट्रिकसह पंजासमोर स्कॉटलंड धाराशाही! वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी विजय

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६  स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी अमेरिका संघाने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर  भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मोनांक पटेलचा हा निर्णय अमेरिकेच्या गोलंदाजांनी सार्थक ठरवला. भारताचा संघ आपली सुरुवात चांगली करू शकला नाही. भारताने दुसऱ्याच षटकात ८ धावांवरच आपला पहिला गडी गमावला. भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा भोपळा न फोडताच माघारी गेला. त्याला अली खानने बाद केले.

त्यानंतरही भारताची टॉप ऑर्डर झटपट बाद झाली. भारताने ६ ओव्हरमध्ये ४६ धावांवर आपल्या ४ विकेट्स गमावल्या. इशान किशन १६ चेंडूत २० धावा, तिलक वर्मा १६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २५ धावा आणि शिवम दुबे ० धावा करून बाद झाले. भारत ६ ओव्हरमध्ये ४६ धावा अशा  नाजुक परिस्थितीमध्ये पोहचला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव एक बाजूने डाव सावरत होता. परंतु, भारताच्या विकेट्स एक बाजूने जात होत्या. रिंकू सिंग देखील जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. तो १४ चेंडूत ६ धावा करून बाद झाला हार्दिक पंड्याकडून अपेक्षा होत्या परंतु तो देखील  झटपट बाद झाला. पंड्या ५ धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने १४ धावा करून बाद झाला.

Innings Break! Captain Surya Kumar Yadav’s terrific 8⃣4⃣*(49) propel #TeamIndia to 1⃣6⃣1⃣ 👌👌 Over to our bowlers 🙌 Scorecard ▶️ https://t.co/Rlm2ARPnOV#MenInBlue | #T20WorldCup | #INDvUSA pic.twitter.com/6cI4ctXIVk — BCCI (@BCCI) February 7, 2026

सूर्याची नाबाद ८४ धावांची खेळी

दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली आणि त्याने आपले अर्धशतक केले. त्यानंतर र्शदीप सिंग ४ धावा करून बाद झाला.  अर्धशतक ठोकल्यावर सूर्या अधिक घातक झालेला दिसून आला. त्याने भारताला संकटातून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु, त्याला इतर खेळाडूंकडून चांगली साथ मिळाली नाही. सूर्याने भारताला १६१ पर्यंत पोहचवले आणि तो ४९ चेंडूत ८४ धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले. तर वरुण चक्रवर्ती ० धावांवर धावबाद झाला. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ४  तर हरमीत सिंगने २ विकेट्स घेतल्या. तसेच अली खान आणि मोहम्मद मोहसीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत  इलेव्हन : इशान किशन (w), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्लेइंग इलेव्हन: अँड्रिज गॉस (डब्ल्यू), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (क), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावलकर

हेही वाचा : IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात

Web Title: T20 world cup live suryakumars captains knock sets a target of 162 runs for india against usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • IND vs USA
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात
1

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान
2

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान

IPL 2026 : तिलक वर्माच्या फलंदाजीच्या क्रमावर सूर्यकुमार यादवचे मजेदार प्रत्युत्तर, हार्दिक पांड्याकडे केला इशारा
3

IPL 2026 : तिलक वर्माच्या फलंदाजीच्या क्रमावर सूर्यकुमार यादवचे मजेदार प्रत्युत्तर, हार्दिक पांड्याकडे केला इशारा

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा
4

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.