Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Indians New Jersey Video: ‘चला भेटूया वानखडेला…’, ‘MI’ च्या नवीन जर्सीचा लुक आला समोर; कॅप्टन पंड्याचा खास संदेश पहाच

२३ मार्च रोजी,कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने येणार आहेत. दरम्यान स्पर्धा सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉंच झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2025 | 05:08 PM
Mumbai Indians New Jersey Video: 'चला भेटूया वानखडेला...', 'MI' च्या नवीन जर्सीचा लुक आला समोर; कॅप्टन पंड्याचा खास संदेश पहाच

Mumbai Indians New Jersey Video: 'चला भेटूया वानखडेला...', 'MI' च्या नवीन जर्सीचा लुक आला समोर; कॅप्टन पंड्याचा खास संदेश पहाच

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Indians have unveiled their Brand New Jersey for the Upcoming Tata IPL Season 2025 :मार्च महिन्यापासून इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे. IPL च्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झाले. २२ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर गतविजेत्या KKR आणि RCB यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाणार आहे. तर २३ मार्च रोजी,कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने येणार आहेत. दरम्यान स्पर्धा सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉंच झाली आहे. त्याचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सने आपली नवीन जर्सी लॉंच केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील मुंबई इंडियन्सने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या नवीन जर्सीमध्ये मुंबई इंडियन्सची ओळख दर्शवणारे रंग तसेच ठेवण्यात आले आहेत. दरम्यान सोशल मिडियामध्ये शेअर झालेल्या या व्हिडिओमधून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या चाहत्यांना एक संदेश देखील दिला आहे.

👕 𝗧𝗛𝗜𝗦 𝗜𝗦 𝗔 𝗣𝗥𝗢𝗠𝗜𝗦𝗘 𝗧𝗢 𝗬𝗢𝗨 📝

आपल्या मुंबईची jersey for the 𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟓 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 💙 👉 https://t.co/FgRK3BUE6a#MumbaiIndians pic.twitter.com/cYbhV5V5L6

— Mumbai Indians (@mipaltan) February 21, 2025

 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यान एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात हार्दिक पंड्या म्हणाला, ‘प्रिय पलटण. 2025 हे वर्ष आपल्या टीमचा वारसा ज्या ठिकाणी असायला हवा, त्या ठिकाणी तो नेण्याची एक संधी आहे. निळा आणि सोनेरी रंगाचा पोशाख परिधान करून मुंबईप्रमाणे खेळण्यासाठी मैदानात उतरू. ही केवळ आमची जर्सी नाही तर आमचे एक वचन देखील आहे. चला भेटूयात वानखेडे स्टेडियमवर.’

🫵 • 👕 • 💙

Visit the MI Shop and get your jersey 𝙉𝙊𝙒 👉 https://t.co/aUFV1sbjeB#MumbaiIndians pic.twitter.com/yuTAIo02kg

— Mumbai Indians (@mipaltan) February 21, 2025

 

मुंबई इंडियन्सच्या नवीन जर्सीबद्दल बोलायचे झाल्यास ती जर्सी आकर्षक दिसत आहे. नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सचा संघ निळ्या आणि सोनेरी रंगाच्या जर्सीमध्ये दिसून येत आहे. जर्सीच्या उजव्या बाजूला स्पॉन्सरचा लोगो दिसून येत आहे. तर डाव्या बाजूस मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा लोगो दिसून येत आहे.  या नवीन जर्सीमध्ये मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूनी फोटोशूट केले आहे.

हार्दिकवर एका सामन्याची बंदी

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या खेळू शकणार नाही. गेल्या हंगामात, स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती आणि ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. BCCI ने गेल्या वर्षी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की, हा त्यांच्या संघाचा या हंगामातील तिसरा ओव्हर-रेट गुन्हा होता, त्यामुळे पंड्याला दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा: IPL 2025 : हार्दिक पांड्या नाही तर रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व; MI सापडली मोठ्या अडचणीत

हार्दिकऐवजी फक्त रोहितच का?
हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत संघ माजी कर्णधार रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवू शकतो. रोहितच्या नेतृत्वाखाली, MI ने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये पाच IPL जेतेपद जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सने IPL च्या अंतिम सामन्यात CSKला तीनदा हरवले आहे आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्यांचा २०-१७ असा प्रभावी विक्रम आहे.

Web Title: Tata ipl 2025 mumbai indians jersey launch hardik pandya send emotional message to mi team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • MI Captain Rohit Sharma
  • mumbai indians

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर
2

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये  रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?
3

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?

Asia Cup 2025 साठी सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे नाही? तर पंड्याची फिटनेस चाचणी होणार
4

Asia Cup 2025 साठी सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे नाही? तर पंड्याची फिटनेस चाचणी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.