IPL 2025 : हार्दिक पांड्या नाही तर रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व, MI सापडली मोठ्या अडचणीत
IPL 2025 : IPL 2024 च्या आधी, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला काढून हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले. त्यावेळी या निर्णयाला तीव्र विरोध झाला. पाच वेळा विजेता असलेला संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी होता. पण आता असे दिसते की २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात हार्दिकच्या जागी रोहित शर्मा कर्णधारपद भूषवू शकतो. या निर्णयामागे फ्रँचायझीची मोठी सक्ती आहे.
मुंबईचा पहिला सामना २३ मार्च रोजी आहे.
ईडन्स गार्डनवर होणार IPL 2025 ची सुरुवात
खरंतर, IPL च्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झाले. २२ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर गतविजेत्या KKR आणि RCB यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी, म्हणजे २३ मार्च रोजी, IPL चा ‘एल क्लासिको’ होणार आहे ज्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने येणार आहेत.
हार्दिकवर एका सामन्याची बंदी
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या खेळू शकणार नाही. गेल्या हंगामात, स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती आणि ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. BCCI ने गेल्या वर्षी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की, हा त्यांच्या संघाचा या हंगामातील तिसरा ओव्हर-रेट गुन्हा होता, त्यामुळे पंड्याला दंड ठोठावण्यात आला.
हार्दिकऐवजी फक्त रोहितच का?
हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत संघ माजी कर्णधार रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवू शकतो. रोहितच्या नेतृत्वाखाली, MI ने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये पाच IPL जेतेपद जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सने IPL च्या अंतिम सामन्यात CSKला तीनदा हरवले आहे आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्यांचा २०-१७ असा प्रभावी विक्रम आहे.
सूर्या हादेखील एक मजबूत पर्याय
जर रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला तर मुंबई इंडियन्सकडे सूर्यकुमार यादवसारखा एक मजबूत पर्यायदेखील आहे. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्याने १६ एप्रिल २०२३ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी कर्णधारपदाची सुरुवात केली. दुसरीकडे, रोहितला पहिल्यांदा २०१३ च्या हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोपवण्यात आले होते, त्यानंतर २०२३ पर्यंत त्याने एकूण १५८ सामन्यांमध्ये फ्रँचायझीचे नेतृत्व केले आहे.
हेही वाचा : IND vs BAN : पहिल्या सामन्यातून हर्षित राणा बाहेर? मोहम्मद शामीचा जोडीदार मिळाला