
संजू सॅमसनने केली 48 रन्सची खेळी
केकेआरकडून सुनील नरेन अन् फील एलन ओपनिंगला
केकेआरला सीएककेने दिलेले 193 रन्सचे टार्गेट
Tata IPL 2026 CSK Vs KKR Live Updates: आज चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नात रायडर्स यांच्यात सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम (IPL) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 192 रन्स केल्या आणि केकेआरला 193 रन्सचे टार्गेट दिले होते. दरम्यान या सामन्यात सीएसकेने केकेआरचा 32 रन्सने पराभव केला आहे.
केकेआरची फलंदाजी
193 रन्सचा पाठलाग करण्यासाठी सुनील नरेन आणि एलन फील सलामीला मैदानात उतरले. दरम्यान एलन फील चांगली खेळी करू शकला नाही. एलन 1 च रन करून आउट झाला. तर सुनील नरेन 17 बॉलमध्ये 24 रन्स करून आउट झाला, त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगरीक्ष रघुवंशी खेळण्यासाठी आले. अंगरीक्ष रघुवंशी 27 रन्स करून आउट झाला. तर अजिंक्य रहाणे देखील मोठा फटका मारण्याच्या नादात 28 रन्स करून आउट झाला. कॅमेरून ग्रीन एकही रन न करता आउट झाला. रिंकू सिंग देखील केकेआरसाठी चांगली खेळी करू शकला नाही.
CSK Vs KKR Live: ‘केकेआर’चा गोलंदाजीचा निर्णय; चेन्नईच्या अडचणी वाढणार; कारण…
केकेआरची गोलंदाजी
कोलकाताच्या संघात केवळ एकच बदल करण्यात आला आहे: नवदीप सैनीच्या जागी वरुण चक्रवर्ती आजचा सामना खेळत आहे. कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने 2 बळी मिळवले. एक विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, चेन्नईला आपल्या धडाकेबाज सुरुवातीला साजेसी अशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कार्तिक त्यागीने शेवटचे षटक टाकले आणि त्यात त्याने एकही चौकार किंवा षटकार जाऊ दिला नाही. शेवटच्या तीन षटकांत, केकेआरच्या गोलंदाजांनी केवळ 23 धावा दिल्या आणि चेन्नईवर आपली पकड अधिकच घट्ट केली.
The home side with a successful powerplay ☝️☝️#KKR 36/2 after 6 overs. Who is taking the victory tonight? 🤔 Updates ▶️ https://t.co/jWkXVCPxj5#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvKKR pic.twitter.com/EdWQFd1iop — IndianPremierLeague (@IPL) April 14, 2026
सीएककेची फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना, चेन्नई सुपर किंग्सने आपल्या निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून एकूण 192 धावा उभारल्या. संघासाठी संजू सॅमसनने एक उत्कृष्ट खेळी साकारली; त्याने 32 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. दुसरीकडे, कोलकातासाठी कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने 2 बळी मिळवले. एक विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, चेन्नईला आपल्या धडाकेबाज सुरुवातीला साजेसी अशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संघाने पॉवरप्लेमध्ये म्हणजेच सुरुवातीच्या सहा षटकांत बोर्डवर 72 धावा आधीच जमा केल्या होत्या. त्यानंतर, संघाला 230धावांचा टप्पा सहज गाठता येईल, असे वाटत होते. मात्र, पॉवरप्लेनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी आपली पकड मजबूत केली आणि चेन्नईला खरोखरच एक प्रचंड मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. अखेरीस, संघाला 200 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.
सीएककेची गोलंदाजी
सीएसकेकडून खलील अहमदने 1 विकेट घेतली. त्याने सुनील नरेनला आउट केले. तसेच अंशूल कंबोजने फील एलनला आउट केले. नूर अहमदने कर्णधार अजिंक्य रहाणेला 28 रन्सवर आउट केले. तर त्याने कॅमेरून ग्रीनची देखील विकेट घेतली.
सीएसकेची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन , आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अकिल हुसेन , नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जनप्रीत सिंग, कार्तिक शर्मा.
केकेआरची संभाव्य टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ॲलन, कॅमेरून ग्रीन, अँगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमणदीप सिंग, सुनील नरीन, नदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती.