Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI : हे आपल्यासोबतच असं का होतंय यार? नाणेफेक जिंकलो, पण सामना गमावला; वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय

IND vs WI : मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली आहे. आता शनिवारी मालिकेतील पाचव्या व अखेरच्या सामन्यात ट्रॉफी कोण जिंकणार हे निश्चित होणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 14, 2026 | 11:03 PM
IND vs WI : हे आपल्यासोबतच असं का होतंय यार? नाणेफेक जिंकलो, पण सामना गमावला; वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय

IND vs WI : हे आपल्यासोबतच असं का होतंय यार? नाणेफेक जिंकलो, पण सामना गमावला; वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय

Follow Us
Follow Us:
  • शाई होपचे झंझावाती शतक
  • किमो पॉलचे 5 विकेट
  • मालिका निर्णायक वळणावर
 

IND vs WI : हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशन स्टेडियममध्ये पार पडलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 24 धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे ही मालिका 2-2 अशी बरोबरीत आली असून मालिकेचा निकाल शेवटच्या सामन्याने लागणार हे निश्चित झाले आहे. कर्णधार शाई होप (नाबाद 102) च्या खणखणीत शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारतासमोर 3 बाद 248 धावांचे आव्हान दिले होते.
दुसरीकडे, टी-20 मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज संघात असतानाही भारतीय संघाला हे धावांचे विशाल डोंगर पोखरता आले नाही. परिणामी भारताला 9 बाद 223 धावांचा पल्ला गाठता आला. मालिकेतील तीन सामन्यात भारताने नाणेफेक गमावले होते, चौथ्या सामन्यात मात्र नाणेफेक भारताने जिंकला व त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, पण तो काही योग्य ठरला नाही.

वेस्ट इंडिजचा धावांचा पाऊस

ज्वेल अॅण्ड्रयू आणि कर्णधार शाई होपने वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात केली. मात्र ज्वेल हा केवळ 21 रन्सची खेळी करून आउट झाला. त्यानंतर शिमरन हेटमायर आणि शाई होपने वेस्ट इंडिजची बाजू सांभाळून धरली. पॉवर प्लेमध्ये अधिक विकेट न गमावता धावसंख्या वाढवण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले. शिमरन हेटमायर 33 रन्स करून आउट झाला. तर रोमवेन पॉवेल देखील 24 रन्स करून माघारी परतला.

शेरफेन रदरफोर्ड आणि कर्णधार शाई होपने वेस्ट इंडिजला 200 च्या पार नेऊन ठेवले. दोघांनी अत्यंत आक्रमक खेळी केली. दरम्यान, होपने 50 चेंडूंत 9 षटकार व 4 चौकारच्या मदतीने नाबाद 102 धावांची खेळी केली. तर रदरफोर्डही 26 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या जोरावर 49 धावांवर नाबाद राहिला.

याही सामन्यात भारताचे गोलंदाज चमकले नाहीत. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल व प्रिन्स यादवला जरी प्रत्येकी 1 विकेट मिळाला असला, तरी त्यांची वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली.

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?

भारताची चांगली सुरुवात पण…

एक वेळ चौथ्या षटकात म्हणजे पॉवर प्लेमध्ये भारताची स्थिती नाबाद 60 धावा अशी होती. यात सलामीला आलेल्या संजू सॅमसनच्या 56 धावांचा समावेश होता. तर दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा मात्र सावरून खेळताना दिसला. शाई होपने पाचवे षटक टाकण्यास किमो पॉलला बोलावले. पॉलने कर्णधाराच्या विश्वासाला सार्थकी लावत या षटकात सुरुवातीला संजू, तर त्याच्या तीन चेंडूनंतर ईशान किशन (6)ला बाद करत भारताला दोन धक्के दिले.

संजूने 20 चेंडूंतच आपले अर्धशतक झळकावले. परंतु अतिआक्रमकतेच्या नादात तो शिमरेन हेटमायरला सिमारेषेजवळ झेल देऊन बसला. त्याने 23 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर (16)ने काही काळ अभिषेकला साथ दिली, मात्र तोही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.

गुडाकेश मोतीने डावातील 11 व्या षटकात अभिषेक शर्मा (29) व नमन धीर असे एकामागोमाग एक धक्के दिले. अखेरच्या क्षणी तिलक वर्मा (43) व नितिश रेड्डी (41)ने धुवाधांर फलंदाजीस सुरुवात केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. वेस्ट इंडिजकडून किमो पॉलने 5 विकेट घेतले.

एका निर्णयाने बदललं आयुष्य! Gautam Gambhir यांच्या मनात आजही एक खंत! पहिलं प्रेम अधुरं राहिलं? जाणून घ्या खास किस्सा

Web Title: Ind vs wi 4th t20 west indies beat india series level rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 11:03 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Sanju Samson
  • Shai Hope

संबंधित बातम्या

IND Vs WI: कर्णधार Shai ने गुंडाळल्या भारताच्या ‘होप’? विजयासाठी ‘इतक्या’ रन्सचे असणार आव्हान
1

IND Vs WI: कर्णधार Shai ने गुंडाळल्या भारताच्या ‘होप’? विजयासाठी ‘इतक्या’ रन्सचे असणार आव्हान

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
2

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड
3

IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड
4

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.