CSK vs PBKS Live Streaming (फोटो- ट्विटर)
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना
एम. एम. चिदंबरम स्टेडियमवर येणार आमने-सामने
श्रेयस अय्यर खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष
Tata IPL 2026 Live PBKS vs CSK Toss Update: आज संध्याकाळी 7.30 वाजता एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टॉस झाला. पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आज आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल. तर पंजाब किंग्ज आपला विजयी रथ पुढे नेण्यासाठी मैदानात उतरतील. श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड (CSK vs PBKS) यांच्यासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.
संजू सॅमसनची बॅट तळपणार?
चेन्नई सुपर किंग्जकडून संजू सॅमसन ओपनर म्हणून उतरणार आहे. दरम्यान भारताच्या माजी कर्णधाराने संजू सॅमसनबाबत विधान केले आहे. भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी आज संजू सॅमसन चांगली खेळी करेल असे म्हंटले आहे. आजचा सामना चेन्नईमध्ये आहे. चेन्नईमध्येच संजू सॅमसनने टी-20 वर्ल्ड कपमध्ये कमबॅक केले होते. त्यानंतर त्याने मॅन ऑफ द सिरिज पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे आज देखील चेपॉकमध्ये संजू चांगली खेळी करेल आणि पंजाबला पराभूत करेल, असे भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत म्हणाले आहेत.
PBKS च टेन्शन CSK साठी खुशखबर! Shreyas Iyer खेळणार? समोर आली ‘ही’ मोठी बातमी
आजचा पीच रिपोर्ट काय?
एम. ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी मदतशीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते. मिडल ऑर्डरमध्ये फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकतात. मात्र चेन्नईच्या स्टेडियमवर गेल्या काही सामन्यांमध्ये धावा जास्त झाल्या आहेत.
🚨 TOSS 🚨@PunjabKingsIPL won the toss against @ChennaiIPL and will field first Updates ▶️ https://t.co/riWrE2EZiF#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvPBKS pic.twitter.com/QcgJtAviOp — IndianPremierLeague (@IPL) April 3, 2026
प्रथम फलंदाजी केल्यास फायदा होऊ शकतो असे एकंदर रिपोर्टनुसार दिसून येत आहे. आतापर्यंत या स्टेडियमवर 91 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 51 आणि नंतर फलंदाजी करणार संघ 41 सामने जिंकले आहेत. या ठिकाणी आजकहा सामना हायस्कोअरिंग होऊ शकतो.
CSK Vs PBKS Pitch Report: आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित
चेन्नई सुपर किंग्ज : संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅट शॉर्ट, शिवम दुबे, सरफराज खान/प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद,
पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, 10 विजयकुमार सिंह, विजयकुमार सिंह, युझवेंद्र चहल






