भारत विरुद्ध श्रीलंका (फोटो- ट्विटर)
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. देवदत्त पडीकलच्या शानदार १६७ रन्सच्या खेळीच्या जोरावर भारताने ४६२ रन्स केल्या. त्याला ध्रुव जुरेलने अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. केएल राहुलने शानदार ८२ रन्सची महत्वाची खेळी केली. बाकीचे फलंदाज काहीसे अपयशी ठरल्याचे दिसून आले. त्यानंतर ४६२ रन्सचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला.
श्रीलंकेच्या संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीलंकेला पहिला दणका दिला. श्रीलंकेची स्थिती ९९ वर ५ विकेट्स अशी झाली होती. निशान फर्नांडो शून्यावर आउट झाला. लाहिरू उदारा २७ रन्स करून आउट झाला. दिनेश चंडीमा केवळ ४ रन्सची खेळी करून आउट झाला.
IND Vs SL: पुन्हा श्रीलंकेची दाणादाण! फॉलोऑन टाळण्यासाठी कराव्या लागणार ‘इतक्या’ रन्स…
त्यानंतर कामिंदू मेंडिसने १४ रन्सची खेळी केली. कर्णधार धनंजया डी सिल्वाने २१ रन्सची केली. त्याने निराशा केली. मात्र सोनल दिनुषाने शानदार शतक लगावले. त्यामुळे श्रीलंकेचा संघाने काहीसे पुनरागमन केले आहे. निरोशन डिकवेलाने देखील ८० रन्सची खणखणीत खेळी केली. बाकीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.
Two wickets in quick succession! Ravindra Jadeja 🤝 Manav Suthar Sri Lanka lose their 9th wicket. Updates ▶️ https://t.co/M9LVyCAp8y#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/3YkvINQMUk — BCCI (@BCCI) August 17, 2026
भारतीय गोलंदाजीने अचूक मारा केला. त्यामुळे श्रीलंकेचा डाव २८४ रन्सवर ऑल आउट झाला. मानव सुथारने शानदार गोलंदाजी करत महत्वाच्या ४ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. तर कुलदीप यादवने एक विकेट तर रवींद्र जाडेजाने ३ विकेट्स घेतल्या.
IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली