Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Test retirement : Rohit Sharma च्या निवृत्तीचे MS Dhoni च्या ‘या’ गोष्टीशी आहे साम्य! दोघांनी एकाच वेळी.., वाचा सविस्तर..

भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता चाहत्यांकडून त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संबंध लावण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 08, 2025 | 01:07 PM
Test retirement: Rohit Sharma's retirement is similar to MS Dhoni's 'this' thing! Both of them at the same time.., read in detail..

Test retirement: Rohit Sharma's retirement is similar to MS Dhoni's 'this' thing! Both of them at the same time.., read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma Test retirement  : भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सर्वांना वाटत होते की तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भाग घेईल परंतु या मालिकेपूर्वी त्याने आपली निवृत्ती जाहीर केलीय आहे. पण, आता चाहत्यांना त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संबंध आढळून आला आहे.

रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची  घोषणा केली. रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील अद्भुत प्रवासाबद्दल सोशल मीडियावरील चाहते त्याचेअभिनंदन करत व्यक्त होत आहेत. दरम्यान, एक लक्ष वेधून घेणारी  मनोरंजक गोष्ट समोर आली आहे, जी जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माचा प्लॅन होता तयार? 2 महीने आधीच कसोटी क्रिकेटला करणार होता अलविदा, वाचा सविस्तर…

खरंतर, एमएस धोनीनेही सोशल मीडियाद्वारेच निवृत्तीची घोषणा केली होती. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने क्रिकेटमधील त्याचा क्रिकेट प्रवास दाखवला होता. कॅप्शनमध्ये असेही लिहिले – ‘तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी १९:२९ वाजता निवृत्त झालो असे समजा. आता, ५ वर्षांनंतर, त्याच वेळी, रोहित शर्माने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती सर्वांना धक्का दिला आहे.

MS Dhoni in 2020 🤝 Rohit Sharma in 2025 Both announced their retirements at 19:29 🇮🇳#RohitSharma | #TestCaptain | #Hitman pic.twitter.com/vLbK6gRjED — Indian Cricket Team (@incricketteam) May 7, 2025

जेव्हा जेव्हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांबद्दल चर्चा होते, तेव्हा एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांची नावे नक्कीच घेतली जणार आहेत. दोघांच्याही नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक मोठ्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि अनेक मोठ्या कामगिरीही केल्या आहेत. आता दोघांचेही निवृत्ती कनेक्शन समोर आले आहे. माहीने २०२० मध्ये संध्याकाळी ७:२९ वाजता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर ७ मे २०२५ रोजी रोहित शर्माने देखील संध्याकाळी ७:२९ वाजता कसोटीतून निवृत्ती होत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा : ‘Operation Sindoor,’ ने पाकिस्तान क्रिकेट हादरलं! PSL मधील परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे सावट, PCB कडून निवेदन जारी..

रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबाबत बोललो तर त्याने २०१३ मध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात शर्माने शानदार शतक झळकावून आपल्या कसोटी कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. रोहितने ६७ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १८ अर्धशतके आणि १२ शतके लगावली आहेत. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ८८ षटकार मारले आहेत. हिटमॅन वीरेंद्र सेहवाग (९१ षटकार) नंतर तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे.

Web Title: Test retirement rohit sharmas retirement is similar to this thing about ms dhoni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • MS Dhoni Captain
  • Rohit Sharma
  • Test cricket

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी
4

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.