'Operation Sindoor,' ने पाकिस्तान क्रिकेट हादरलं! PSL मधील परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे सावट(फोटो-सोशल मीडिया)
Operation Sindoor : ७ मे रोजी सकाळी प्रत्येक भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहाटे १.३० ते २ च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या काळात पाकिस्तानच्या आश्रयास असणाऱ्या दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले. भारताच्या या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानमध्ये अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर तेथील सामान्य नागरिक देश सोडण्याची भाषा बोलू लागले आहेत. ऑपरेशन सिंदूरची झळ पीएसएल २०२५ ला देखील बसली आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन देखील आता धोक्यात आले आहे.
सर्वात मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे तो म्हणजे, पाकिस्तान सुपर लीग २०२५ मध्येच थांबवली जाणार आहे का?अशा परिस्थितीत, भारताच्या कारवाईनंतर, परदेशी खेळाडू चिंतेत असल्याच्या बातम्याही पुढे येत आहेत. परदेशी खेळाडूंचे क्रिकेट बोर्डही त्यांच्या खेळाडूंबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे. या संदर्भात, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून त्यांच्या खेळाडूंबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने काळजी व्यक्त केली आहे. बोर्डाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “आम्हाला संबंधित अहवालांची माहिती आहे. आम्ही आमच्या खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम सल्ला मिळावा यासाठी सुरक्षा वातावरणाचे मूल्यांकन करत राहतो. सध्या, आमचा राष्ट्रीय पुरुष अ संघ बांगलादेशमध्ये सतेच आणि आयपीएल आणि पीएसएल दोन्हीमध्ये न्यूझीलंडचे खेळाडू सहभागी आहेत. आम्ही सुरक्षेचे मूल्यांकन करत आहोत.”
Praying India and Pakistan situation deescalates asap 🙏🏼
— Sam Billings (@sambillings) May 6, 2025
याशिवाय इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्जनेकडून देखील आपली चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याने लिहिले आहे की, “भारत आणि पाकिस्तानमधील हे तणावपूर्ण वातावरण लवकरच संपावे अशी मी देवाला प्रार्थना करतो.” त्याच वेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाचा पाकिस्तान सुपर लीगवर कोणता देखील परिणाम होणार नाही. असे म्हटले आहे.
NZ Cricket “we are aware of the relevant reports. We continue to assess the security environment for our players and coaching staff in all overseas environments to ensure they’re in receipt of the most updated advice. This includes our national men’s A team in Bangladesh, and New…
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) May 7, 2025
७ मे रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात कोणताही बदल होणार नसल्याचेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तो त्याच्या नियोजित वेळेनुसार खेळला जाणार आहे.