रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma Test retirement : भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निर्णयामुळे त्याचे चाहते खूप निराश झालेचे दिसत आहेत. कारण सर्वांना वाटत होते की तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भाग घेईल परंतु या मालिकेपूर्वी त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.यावेळी रोहित शर्माने केवळ कसोटी कर्णधारपद सोडले नसून संपूर्ण कसोटी क्रिकेटलाच अलविदा म्हटले आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र, आता पीटीआयच्या एका वृत्तानुसार, रोहितने आता ज्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, तो निर्णय रोहित 2 महिन्यांपूर्वीच सांगणार होता. म्हणजेच, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर त्याने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेण्याचा विचार केला होता. रोहित शर्माने असा अचानक निर्णय का घेतला? असा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागले आहेत.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नवे केले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरच रोहितकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करण्यात आला. रोहितच्या जवळच्या सूत्रांकडून ही माहिती पीटीआयला माहिती मिळाली. रोहितला निवृत्तीची हीच योग्य वेळ वाटली, असे देखील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. म्हणजे, तो निर्णय घेत असताना रोहितने टीम इंडियाचा फायदा लक्षात घेतलेला दिसून येतो.
Countless memories, magnificent moments. Thank you, Captain 🫡🫡#RohitSharma pic.twitter.com/l6cudgyaZC — BCCI (@BCCI) May 7, 2025
बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला की, जर रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याला संघातून वगळण्याची चर्चा कशी झाली? अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती रोहितला संघात स्थान देण्याबाबत संभ्रमात होते. तर इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा होण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी होता, असे या अहवालात म्हटले गेले आहे. पण आपल्या रोहितने टेस्टमधून निवृत्तीच्या घोषने घोषणेने निवडकर्त्यांसमोरील चिंता दूर केली आहे.
बीसीसीआयने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील काही डाव दाखवण्यात आले आहेत. तसेच यामध्ये रोहित म्हणत आहे की, तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही स्वतःच अभिमानाची अशी गोष्ट आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी देखील इंस्टाग्रामवर पोस्ट करून रोहितचे निवृत्तीबद्दल अभिनंदन केले आहे. याशिवाय बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांच्याकडून हिटमॅनला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.