
Mahrashtra Kesari विजेत्याला मिळणार मानाची गदा अन्...; कधी सुरू होणार कुस्ती स्पर्धा?
विजेत्याला मिळणार मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी
पुणे जिल्हातील वाघोली येथे होणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
१८ ते २२ मार्च रोजी होणार स्पर्धा
पुणे: महाराष्ट्रातील पारंपारिक आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे (Sports) ६८ वे अधिवेशन यंदा पुणे जिल्हातील वाघोली येथे रंगणार आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव यांच्या वतीने ही स्पर्धा १८ ते २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी, बाजार मैदान वाघोली पुणे येथे होणार असून क्रीडा क्षेत्रातील स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून क्रीडानगरीला स्व. अजितदादांचे नाव देण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे तर २२ मार्च रोजी बक्षीस वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्र केसरी विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी, उपमहाराष्ट्र विजेत्याला स्कॉर्पिओ एन गाडी, तसेच माती व गादी विभागातील विविध वयोगटातील सुवर्णपदक विजेत्यांना १८ बुलेट मोटारसायकली , रौप्यपदक विजेत्यांना स्प्लेंडर मोटारसायकली असे बक्षिसाचे स्वरूप असणार आहे असे रामकृष्ण सातव यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Karjat News : कर्जत तालुक्यात 25 वर्षांची परंपरा; रोटरी क्लब आयोजित कबड्डी स्पर्धेचा उत्साह शिगेला
कर्जत तालुक्यात 25 वर्षांची परंपरा
कर्जत तालुक्यात गेली 25 वर्षे मुंबई येथील रोटरी क्लब देवनार कडून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.याच माध्यमातून रोटरी कप कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेत कळंब जवळील सुतारपाडा येथील कबड्डी संघ अंतिम विजेता ठरला. कर्जत तालुक्यात असलेल्या ग्रामीण रोटरी मंडळ यांची कबड्डी स्पर्धा देवनार रोटरी क्लब कडून दरवर्षी आयोजित करण्यात येते.माणिवली येथील हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कर्जत तालुक्यातील ग्रामीण रोटरी मंडळ यांच्या कबड्डीत स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेचा शुभारंभ देवनार रोटरीचे अध्यक्ष अलका मुरली यांचे हस्ते झाला.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत क्रिकेट बोर्डाने केली अपील , बीसीसीआयकडून मोठी मागणी
या स्पर्धेत ग्रामीण रोटरी मंडळाचे शेलू,हूमगाव,कळंब, पोटल पाली,माणिवली, भिवपुरी,बोरगाव, आंबेवाडी, सुतारपाडा,हे संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेत प्रमुख उपस्थित राहिलेल्या राष्ट्रीय आईस स्टॉक खेळाडू निसर्गा गवळी आणि बचत गटांची चळवळ चालवणाऱ्या रेखा हिरेमठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या पाच महिलांचा सत्कार देखील रोटरी कडून करण्यात आला.स्पर्धेचे सुरुवातीला रोटरी अध्यक्ष अलका मुरली यांचे हस्ते हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.त्यानंतर माणिवली शाळेचे विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेसाठी आलेले खेळाडू आणि पाहुण्याचे लेझिम पथकाचे सहायाने स्वागत केले.