Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ

आशिया कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आशिया कप २०२५ च्या बक्षीस रकमेत पूर्ण १ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आशिया कप २०२५ च्या बक्षीस रकमेत पूर्ण १ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 09, 2025 | 01:44 PM
फोटो सौजन्य - AsianCricketCouncil

फोटो सौजन्य - AsianCricketCouncil

Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup 2025 prize money : आशिया कप 2025 चा आज शुभारंभ सुरु होणार आहे, आजचा सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन अबुधाबीमध्ये करण्यात आले आहे. तर टीम इंडिया उद्या म्हणजेच १० सप्टेंबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. या स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार १४ सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

आशिया कप २०२५ मध्ये एकूण ८ संघ सहभागी होत आहेत, ज्यांना प्रत्येकी ४-४ अशा दोन गटात विभागले गेले आहे. गट अ मध्ये ओमान आणि यूएईसह भारत-पाकिस्तान सारखे संघ आहेत.  गट ब मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँगसह गतविजेता श्रीलंका आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आशिया कप २०२५ च्या बक्षीस रकमेत पूर्ण १ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

AFG vs HK : आशिया कपच्या पहिल्या सामन्यात कशी असेल खेळपट्टी? अफगाणी गोलंदाजांना आज मदत मिळणार का…वाचा खेळपट्टीचा अहवाल

गेल्या वेळी, जेव्हा श्रीलंकेने २०२२ मध्ये टी-२० स्वरूपात आशिया कप जिंकला होता, तेव्हा त्यांना सुमारे १.६ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली होती. त्याच वेळी, स्पर्धेत उपविजेतेपदासाठी पाकिस्तानला ७९.६६ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली होती. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे सुमारे ५३ लाख आणि ३९ लाख रुपये मिळाले. तथापि, पीटीआयच्या वृत्तानुसार, आशियाई क्रिकेट परिषदेने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाला लक्षात घेऊन यावेळी बक्षीस रकमेत वाढ केली आहे.

२०२२ च्या टी-२० आशिया कपच्या तुलनेत, या वर्षी विजेत्या संघाची बक्षीस रक्कम २.६ कोटी आहे, जी पीटीआयनुसार सुमारे ३००,००० अमेरिकन डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. जी गेल्या आशिया कपच्या बक्षीस रकमेपेक्षा सुमारे एक कोटी भारतीय रुपये जास्त आहे. त्याच वेळी, उपविजेत्या संघाला १.३ कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, वृत्तसंस्थेनुसार, स्पर्धेच्या शेवटी प्लेअर ऑफ द सिरीजला १२.५ लाखांची बक्षीस रक्कम मिळेल. 

Asia Cup 2025 : आशिया कपच्या काॅमेंट्री पॅनलमध्ये कोणत्या पाकिस्तानी खेळाडूंना मिळाले स्थान? या भारतीय दिग्गजांसह करणार काॅमेंट्री

आशिया कप 2025 मध्ये 8 संघ सहभागी झाले आहेत, यामध्ये पहिल्या गटामध्ये पाकिस्तान, भारत, यूएई आणि ओमान हे संघ असणार आहेत. तर दुसऱ्या गटामध्ये अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि हाॅंगकाॅंग हे संघ आहेत. या स्पर्धेत 19 सामने खेळवले जाणार आहेत. यामधील 12 सामने हे साखळी सामने होणार आहेत त्यानंतर एलिमिनेटर सामने खेळवले जाणार आहेत.

Web Title: The team that wins the asia cup 2025 title will be rich there has been a huge increase in the prize money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • IND vs UAE
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?
1

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग
2

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान
3

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला
4

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.