फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कप 2025 चा शुभारंभ सुरु होणार आहे, पहिला सामना या स्पर्धेचा खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना हा 10 सप्टेंबर रोजी हा यूएईविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताचा संघ यूवा खेळाडूंसह मैदानामध्ये उतरणार आहे. भारताचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामना हा 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. त्याआधी आशिया कपमध्ये काॅमेंट्री पॅनलमध्ये काॅमेंट्री कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आशिया कप २०२५ आजपासून अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने सुरू होणार आहे. यावेळी आशिया कपमध्ये ८ संघ सहभागी होत आहेत. त्यांना प्रत्येकी ४ संघांच्या २ गटात विभागण्यात आले आहे. टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये आहे जो १० सप्टेंबरपासून आशिया कप मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना दुबईमध्ये UAE सोबत होईल. या स्पर्धेसाठी भारतीय दिग्गजांसह, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू देखील काॅमेंट्री पॅनलमध्ये काॅमेंट्री करताना दिसतील.
🚨 THE ENGLISH COMMENTARY PANEL OF ASIA CUP 2025 🚨 pic.twitter.com/kkDyOEN6zV
— Tanuj (@ImTanujSingh) September 8, 2025
आशिया कप २०२५ च्या काॅमेंट्री पॅनलमध्ये अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यावेळी आशिया कपचे थेट प्रक्षेपण सोनी लाईव्हवर होणार आहे. सोनी लाईव्ह हा सामना वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करेल. ज्यासाठी भारत-पाकिस्तानसह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंची समालोचन पॅनेलमध्ये निवड झाली आहे. पाकिस्तानकडून बाजीद खान, वकार युनूस, वसीम अक्रम हे समालोचन पॅनेलचा भाग असतील, जिथे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रॉबिन उथप्पा, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, रसेल अर्नोल्ड आणि सायमन डौल त्यांच्यासोबत असतील.
याशिवाय दिनेश कार्तिक, हर्षा भोगले आणि नासिर हुसेन यांचा इंग्रजी समालोचन पॅनेलमध्ये समावेश आहे. याशिवाय, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, अजय जडेजा, सबा करीम आणि माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा हिंदी समालोचन पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर भाराच अरुण आणि डब्ल्यूव्ही रमन सारखे दिग्गज खेळाडू तमिळ समालोचन पॅनेलमध्ये समाविष्ट केले जातील.
आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांसमोर येणार आहेत. या सामन्याची करोडो क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता पहिल्यांदाच दोन्ही संघांमध्ये क्रिकेट सामना होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यावेळी टीम इंडियाचा भाग नसले तरी, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचा पाकिस्तान संघात समावेश नाही.