Asia Cup 2025: आशिया चषकाचे १७ वे पर्व सप्टेंबर २०२५ मध्ये (Asia Cup 2025) संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळले जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणाही झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे, ज्याने २०२३ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले होते. २०२३ चा आशिया चषक ५० षटकांच्या (ODI) स्वरूपात खेळला गेला होता, तर २०२५ ची स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.
याआधी २०२२ चा टी-२० आशिया चषक श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून जिंकला होता. या वर्षीच्या आशिया चषकात एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत, जे मागील सहा संघांच्या तुलनेत दोन अधिक आहेत. यामुळे उदयोन्मुख क्रिकेट संघांना एक मोठे व्यासपीठ मिळणार आहे. ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान अबू धाबी आणि दुबईमध्ये हे सामने खेळले जातील. आठ संघांना प्रत्येकी चार संघांच्या दोन गटांमध्ये विभागले आहे.
या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात जवळपास १ वर्षानंतर शुभमन गिलचे पुनरागमन झाले असून, त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
आतापर्यंत सर्वाधिक ८ वेळा आशिया चषक जिंकण्याचा मान भारतीय संघाने मिळवला आहे. या आठही वेळी वेगवेगळ्या कर्णधारांनी भारताला विजय मिळवून दिला आहे का? चला जाणून घेऊया, आशिया चषक जिंकणारे सर्व भारतीय कर्णधार कोण-कोण आहेत.
विशेष म्हणजे, विराट कोहलीने आशिया चषकात कधीही भारतीय संघाचे नेतृत्व केले नाही.
२०२५ च्या आशिया चषकात टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात असेल. सूर्यकुमार यादवकडे आशिया चषक जिंकणाऱ्या दिग्गज भारतीय कर्णधारांच्या यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची सुवर्णसंधी आहे. कोणत्याही मोठ्या बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल.