Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A Vs SL A Live: विजयाच्या उंबरठ्यावरून मॅच निसटली! सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत पराभूत

भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिले होते. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेला आणि अविष्का फर्नांडो यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे २७ आणि ३२ रन्स करून आउट झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 15, 2026 | 06:42 PM
IND A Vs SL A Live: विजयाच्या उंबरठ्यावरून मॅच निसटली! सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत पराभूत
Follow Us
Follow Us:

ट्राय सिरिजमध्ये भारत अन् श्रीलंका आमनेसामने 
प्रथम फलंदाजी करताना भारताने केल्या २६५ रन्स 
सदिरा समरविक्रमाने केली ९३ रन्सची खेळी 

India A Vs Sri Lanka A Live Updates: श्रीलंकेत सध्या भारत, श्रीलंका आणि अफगणिस्तानमध्ये ट्राय सिरिज सुरू आहे. आज या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. भारताने आजच्या सामन्यात सुयश शेडगेच्या खेळीच्या जोरावर भारताने २६५ रन्स केल्या. भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिल होते. अखेर शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना कोण जिंकणार हे समजून येत नव्हते. अखेर या सामन्यात सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने भारताला पराभूत केले आहे.

श्रीलंकेची फलंदाजी

भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिले होते. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेला आणि अविष्का फर्नांडो यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे २७ आणि ३२ रन्स करून आउट झाले. त्यानंतर विशेन हालंबागे आणि सदिरा समरविक्रमाने श्रीलंकेचा डाव सावरला. सदिरा समरविक्रमाने भारताविरुद्ध ९३ रन्सची दमदार खेळी केली. त्यानंतर आलेले श्रीलंकचे खेळाडू चांगली फलंदाजी करू शकले नाहीत.

IND A vs SL A: क्रिकेटचा सर्वात विचित्र नियम! पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा, तरीही स्कोअरबोर्डवर 14?

भारताची फलंदाजी

भारताकडून प्रभसिमरन सिंह आणि वैभव सूर्यवंशीने सुरुवात केली. मात्र या सामन्यात देखील दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. वैभव सूर्यवंशी २१ रन्स करून आउट झाला. तर प्रभसिमरन केवळ ११ रन्सवर आउट झाला. तर त्यानंतर तुतुराज गायकवाडने ३७ रन्सची लहानशी खेळी करून भारताला सावरले. कर्णधार तिलक वर्मा २३ रन्स करून आउट झाला. आयुष बडोणी आणि निशांत सिंधु हे देखील चांगली खेळी करू शकले नाहीत. सुयश शेडगेने मात्र भारताला सन्मानजनक धावसंख्या उभी करण्यात मदत केली. त्याने ७२ रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली. तर विप्रज निगमने शानदार अर्धशतक लगावले. तो ५१ रन्स करून आउट झाला.

सुपर ओव्हर

भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय झाला. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला १७ रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर भारत सुपर ओव्हरमध्ये केवळ पराभूत झाला आहे.

Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू

वैभव सूर्यवंशी अपयशी 

आयपीएल २०२६ मध्ये ७०० हून अधिक धावा करून आपली पहिली मालिका खेळणारा वैभव सूर्यवंशी सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो १४ चेंडूंमध्ये २१ धावा करून बाद झाला. प्रभसिमरन सिंग, ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार तिलक वर्मा हे देखील स्वस्तात बाद झाले. संघाची धावसंख्या ७ गडी बाद १४३ असताना, विप्राज निगमने (४९ चेंडूंमध्ये ५१ धावा) सूर्यांश शेडगेसोबत (६६ चेंडूंमध्ये ७२ धावा) इंडिया ‘अ’ संघाचा डाव सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आठव्या विकेटसाठी १०४ धावा जोडून इंडिया ‘अ’ संघाची धावसंख्या २६५ पर्यंत पोहोचवली.

Web Title: Tri series sri lanka a beat india a by super over vaibhav sooryavanshi and tilak verma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Tri Series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND A vs SL A: क्रिकेटचा सर्वात विचित्र नियम! पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा, तरीही स्कोअरबोर्डवर 14?
1

IND A vs SL A: क्रिकेटचा सर्वात विचित्र नियम! पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा, तरीही स्कोअरबोर्डवर 14?

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण पुढे ढकलणार? भारताच्या आयर्लंड दौऱ्यावर संकटाचे ढग, देशात हिंसाचार भडकला
2

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण पुढे ढकलणार? भारताच्या आयर्लंड दौऱ्यावर संकटाचे ढग, देशात हिंसाचार भडकला

India A Vs AFG A Live: पावसाने हिरावला भारताचा विजय; DLS  नियमामुळे अफगाणिस्तानचा 4 रन्सने विजय
3

India A Vs AFG A Live: पावसाने हिरावला भारताचा विजय; DLS नियमामुळे अफगाणिस्तानचा 4 रन्सने विजय

IND Vs SL: ऑगस्टमध्ये कसोटी मालिका; तब्बल 9 वर्षांनी भारत श्रीलंकेत जाणार? तारखा जाहीर?
4

IND Vs SL: ऑगस्टमध्ये कसोटी मालिका; तब्बल 9 वर्षांनी भारत श्रीलंकेत जाणार? तारखा जाहीर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.