टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार(फोटो-सोशल मीडिया)
T20 World Cup 2026 : ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच आवड निर्माण झाला आहे. दरम्यान, पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी देण्यात येत असताना आता आयसीसीने या परिस्थितील सामोरे जाण्यासाठी प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती समोर येत आहे. वृत्तांनुसार, जर पाकिस्तानने खरोखरच माघार घेण्याचा निर्णय घेतला तर बांगलादेशला ग्रुप ए मध्ये पाकिस्तानच्या जागी खेळण्याची संधी देण्यात येऊ शकते.
या परिस्थितीमध्ये, बांगलादेश त्याच्या मागणीनुसार, त्याचे सर्व सामने श्रीलंकेत खेळण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, बांगलादेशने आधीच श्रीलंकेत आपले सामने खेळण्यास सहमती दर्शविली होती. या परिस्थितीत आयसीसी बांगलादेश क्रिकेट बोर्डासमोर झुकताना दिसणार नाही. पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतल्यावर, ही नवीन परिस्थिती आयसीसी जगासमोर मांडू शक्यतो.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकामध्ये सामील होण्याबाबतचा अंतिम निर्णय पाकिस्तानकडून किमान शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेशसोबतचा एकोपा म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.
टी२० विश्वचषकातून माघार घेतल्यास पाकिस्तानचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव २४ जानेवारी रोजी बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा गट क समावेश करण्यात आला.
सोमवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी भेट घेतल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली की, बोर्ड टी२० विश्वचषकात सहभागी होण्याबाबत शुक्रवार किंवा पुढील सोमवारपर्यंत अंतिम निर्णय घेणार आहे. बैठकीनंतर नक्वी यांनी ट्विट केले की, “मी पंतप्रधानांसोबत दीर्घ बैठक केली आणि त्यांना आयसीसीच्या मुद्द्याची माहिती दिली आहे. त्यांनी आम्हाला सर्व पर्यायांचा विचार करून तो सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी किंवा पुढील सोमवारी अंतिम निर्णय घेतला जाईल असे ठरले.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अनेक पर्यायांची माहिती देण्यात आली असून त्यामध्ये पाकिस्तानने आपला संघ विश्वचषकात न पाठवणे किंवा स्पर्धेत भाग न घेणे, परंतु १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणे यांचा समावेश असल्याचे समजते. पाकिस्तान ७ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये नेदरलँड्सविरुद्ध टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी अमेरिका, तसेच १५ फेब्रुवारी रोजी भारता विरुद्ध सामना होणार आहे. तर १८ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध सामना असणार आहे.






