
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
पुरुष अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धा सुरु आहे, यामध्ये आज भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध खेळवला जात आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे यांची टीम इंडियान विकेट गमावली आणि टीम इंडिया अडचणीत होती. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर यूएईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला आहे. पहिले फलंदाजी करताना भारताच्या संघाने 6 विकेट्स गमावून 433 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे हा 4 धावा करुन बाद झाला आणि त्यानंतर वैभव सुर्यवंशी आणि आरोन गोरगे यांनी कमालीची भागीदारी केली आणि संघाला मजबूत स्थितीत उभे केले. संघाच्या या कमालीच्या कामगिरीमुळे भारताचा संघ आता विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाने मागील काही दौऱ्यावर देखील दमदार कामगिरी केली आहे. या पहिल्याच सामन्यात भारताच्या दोन फलंदाजांनी अर्धशतक ठोकले तर वैभव सुर्यवंशी याने 171 धावांची दमदार खेळी खेळली.
युएईविरुद्ध, वैभव सूर्यवंशीने थोडी संथ सुरुवात केली, पण एकदा त्याने फटकेबाजी सुरू केली की तो अजिंक्य ठरला. त्याने फक्त ५६ चेंडूत पाच चौकार आणि नऊ षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतरही सूर्यवंशी अजिंक्य राहिला. त्याने त्याचा धावगती आणखी वाढवली. तो त्याच्या द्विशतकाच्या जवळ असतानाच उद्दिश सुरीच्या चेंडूवर शॉट मारण्याच्या प्रयत्नात पकडला गेला. यामुळे त्याने ९५ चेंडूत १७१ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि १४ षटकारांचा समावेश होता.
1⃣7⃣1⃣ runs
9⃣5⃣ deliveries
9⃣ fours
1⃣4⃣ sixes Vaibhav Sooryavanshi sets the tone in style for India U19 with a whirlwind knock against UAE U19 🫡👏#MensU19AsiaCup2025 pic.twitter.com/DcbhMufAxn — BCCI (@BCCI) December 12, 2025
एकदिवसीय सामन्यात १८० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणे हे स्वतःच एक उल्लेखनीय कामगिरी आहे. तो द्विशतकापासून फक्त २९ धावा दूर होता. असे वाटत होते की वैभव द्विशतक करणारा सर्वात तरुण फलंदाज बनून इतिहास रचेल, परंतु त्याने ती संधी गमावली. तरीही, त्याची १७१ धावांची शानदार खेळी कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर आरोन गोरगे याने संघासाठी 69 धावांची खेळी खेळली आणि वैभव सोबत 200 हून अधिक धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाची महत्वाची भागीदारी मोडल्यानंतर उपकर्णधार विहान मल्होत्रा याने देखील 69 धावा केल्या.