Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Making Of A Cricketer: दुर्गम भागातून थेट वर्ल्ड कपच्या मैदानावर; प्रेमा रावतची मन हेलावून टाकणारी कहाणी

भारतीय संघातील श्रेयंका पाटील ही क्रिकेटपटू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. तिच्या जागेवर बीसीसीआयने प्रेमा रावतची निवड केली आहे. आता प्रेमा रावत टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2026 | 02:39 PM
The Making Of A Cricketer: दुर्गम भागातून थेट वर्ल्ड कपच्या मैदानावर; प्रेमा रावतची मन हेलावून टाकणारी कहाणी
Follow Us
Follow Us:

श्रेयंका पाटीलच्या जागेवर प्रेमा रावतची निवड 
भारतीय संघाने जिंकले 3 paiki 2 सामने
उत्तराखंडच्या सुमती गावात झाला प्रेमाचा जन्म 

Prema Rawat/तेजस भागवत: सध्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ चांगली कामगिरी करत आहे. 3 पैकी 2 सामने भारताने जिंकले आहेत. आज आपण ‘द मेकिंग ऑफ अ क्रिकेटर‘ या सिरिजअंतर्गत प्रेमा रावत या क्रिकेटपटूच्या संघर्षाची कहाणी जाणून घेणार आहोत. उत्तराखंड राज्यातील एक लहानश्या गावातून आलेली प्रेमा आज चक्क भारतीय महिला क्रिकेट संघातून टी 20 वर्ल्ड कप खेळत आहे. तिचा हा प्रवास अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे.

भारतीय संघातील श्रेयंका पाटील ही क्रिकेटपटू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. तिच्या जागेवर बीसीसीआयने प्रेमा रावतची निवड केली आहे. आता प्रेमा रावत टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. मात्र तिला या प्रकारे संधी मिळाली असली तरी इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता.

प्रेमा रावत केदार सिंह रावत हे भारतीय वायुसेनेत कार्यरत आहेत. प्रेमाचा जन्म उत्तराखंड राज्यातील बागेश्वर जिल्ह्यातील सुमटी या गावात झाला.  प्रेमाला एकूण दोन भावंडे आहेत. बालपणापासूनच प्रेमाला क्रिकेट खेळण्याची आवड होती. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा टी मैदानावर खेळायला जात असे. तिला शेतीची देखील आवड आहे. इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असली तरी तिची गावातील मातील जोडलेली नाळ अजूनही कायम आहे.

The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते थेट टीम इंडियाची ‘स्टार’; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष

कसा सुरू झाला क्रिकेटचा प्रवास?

प्रेमा रावतला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. आपल्या गावी ती आपल्या भावंडांसोबत क्रिकेट खेळायची. ती क्रिकेटमध्ये ऑल राऊंडर म्हणून खेळते. उजव्या हाताने फलंदाजी तर लेग ब्रेक गोलंदाजी देखील करते. लहानपणी तिच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात ही अंडर 19 संघातून झाली. उत्तराखंडच्या अंडर 19, अंडर 23 संघात देखील तिने खेळ केला आहे. २०२३ च्या सीनियर महिला टी-२० ट्रॉफीमध्ये १० सामन्यात १६ विकेट्स घेऊन ती आघाडीची गोलंदाज ठरली होती

प्रेमा रावतची रणजी संघात देखील निवड झाली होती. त्यानंतर ती थेट डब्ल्यूपीएलमध्ये खेळताना दिसून आली. मात्र यामागे तिची जिद्द आणि मेहनत विसरून चालणार नाही. ग्रामीण भागात जन्म झालेला असून देखील तिने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. क्रिकेटचे धडे गिरवले. तिचे तिचे प्राथमिक शिक्षण गावीच पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे कुटुंब बरेली येथे स्थायिक झाले.

The Making Of A Cricketer: वडिलांचा त्याग अन् Yastika ची अपार मेहनत; अशी बनली वडोदराची लेक टीम इंडियाची ‘स्टार’

2021 मध्ये तिची निवड उत्तराखंडच्या महिला क्रिकेट संघात झाली. त्यानंतर तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले. त्यानंतर तिला महिला प्रीमियर लीगमध्ये संधी मिळाली. ती रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाकडून खेळत होती. त्यानंतर तिची निवड टीम इंडिया अ संघात झाली. तिथून तिने मागे वळून पहिले नाही. तिने थेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता ती निळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. तिने आता भारतीय संघात डेब्यू केले आहे. तिचा हा प्रवास नक्कीच थक्क करणारा होता. लहानश्या गावातून जिद्द, मेहनतीच्या जोरावर प्रेमा रावतने आज आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

Web Title: Uttrakhand sumti village to international cricket prema rawat debut life story the making of a cricketer series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • The Making of A Cricketer
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड
1

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड

The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते थेट टीम इंडियाची ‘स्टार’; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष
2

The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते थेट टीम इंडियाची ‘स्टार’; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार
3

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार

NZ Vs IRE: श्वास रोखणारा सामना! 140 रन्स वाचवताना न्यूझीलंड गडबडले; आयर्लंडचा 4 रन्सने पराभव
4

NZ Vs IRE: श्वास रोखणारा सामना! 140 रन्स वाचवताना न्यूझीलंड गडबडले; आयर्लंडचा 4 रन्सने पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.