Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानमध्ये डंका! ‘त्याच्या शरीरात AI चिप आहे का?’ पाक क्रिकेट तज्ज्ञांची अवाक करणारी प्रतिक्रिया

IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने धुमाकूळ घातला आहे. त्याच्या फलंदाजीवर पाकिस्तानचे दिग्गजही फिदा झाले असून, त्याच्या विक्रमी स्ट्राईक रेटची चर्चा होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 27, 2026 | 09:07 PM
वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानमध्ये डंका! 'त्याच्या शरीरात AI चिप आहे का?' पाक क्रिकेट तज्ज्ञांची अवाक करणारी प्रतिक्रिया (Photo Credit- X)

वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानमध्ये डंका! 'त्याच्या शरीरात AI चिप आहे का?' पाक क्रिकेट तज्ज्ञांची अवाक करणारी प्रतिक्रिया (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानमध्ये डंका!
  • ‘त्याच्या शरीरात AI चिप आहे का?’
  • पाक क्रिकेट तज्ज्ञांची अवाक करणारी प्रतिक्रिया
आयपीएल 2026 (IPL 2026) च्या मैदानात आपल्या वादळी फलंदाजीने गोलंदाजांची झोप उडवणाऱ्या वैभव सूर्यवंशी याच्या नावाचा दबदबा आता पाकिस्तानमध्येही पाहायला मिळत आहे. राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजावर केवळ भारतीयच नव्हे, तर पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञही फिदा झाले आहेत. वैभवची फलंदाजी पाहून काही पाक तज्ज्ञांनी गमतीने “त्याची प्रयोगशाळेत चाचणी करा” असेही म्हटले आहे.

‘त्याला लॅबमध्ये पाठवा’; पाक तज्ज्ञ नौमान नियाज यांची मजेशीर टिपणी

पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक नौमान नियाज यांनी एका शो दरम्यान वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले. वैभवच्या खेळावर भाष्य करताना ते म्हणाले, “हा मुलगा नेमका आहे तरी काय? ज्याप्रमाणे ‘वाडा’ (WADA) डोपिंग टेस्ट करते, तशी त्याची एखाद्या लॅबमध्ये चाचणी व्हायला हवी. कदाचित त्याच्या शरीरात एखादी AI चिप बसवलेली असावी, असा संशय येतो. त्याचा खेळ पूर्णपणे अविश्वसनीय आहे. मला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत, काय खेळाडू आहे हा!”

🚨 AI chip in Vaibhav Sooryavanshi’s bat? – Vaibhav Sooryavanshi is batting like he’s got an AI chip installed. Frankly, just like we have doping tests, he should be tested too. This doesn’t look human. What a player he is!! Unreal! – Dr Nauman Niaz #TATAIPL #RRvsSRH #IPL2026 pic.twitter.com/xUZ4eg2iyU — Tehseen Qasim (@Tehseenqasim) April 26, 2026

नियाज यांनी हसत पुढे असेही म्हटले की, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वैभव थोडा ‘हळू’ खेळला, कारण त्याचा स्ट्राईक रेट किमान 300 असायला हवा होता. 18 वर्षांच्या वयोगटात शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि स्नायूंची ताकद यावर वैद्यकीय भाष्य करत त्यांनी वैभवच्या नैसर्गिक शक्तीचे कौतुक केले.

सूर्याचा उत्तराधिकारी ठरला? हार्दिक की ऋषभ? Team India साठी ‘या’ नावाची जोरदार चर्चा

16 व्या वर्षी अचाट कामगिरी; काय आहे वैभवचे बलस्थान?

वैभवच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य सांगताना नियाज म्हणाले, “वैभव अवघ्या 16 वर्षांचा आहे. जेव्हा त्याचा जन्म झाला होता, तेव्हा विराट कोहली आधीच जगज्जेता झाला होता. वैभवकडे खूप मोठी तंत्रशुद्ध फलंदाजी नसली तरी, त्याच्या खेळातील मनगटाचा वापर आणि त्याचा ‘बॅटिंग आर्क’ त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. त्याची ताकद हीच त्याचे सर्वात मोठे तंत्र आहे.”

आयपीएल 2026 मधील आकडेवारी देतोय गवाही

वैभव सूर्यवंशीने केवळ मैदानावरच नव्हे, तर आकडेवारीमध्येही आपली छाप पाडली आहे:

  • सामने: 8
  • धावा: 357 (ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी)
  • शतक: १
  • स्ट्राइक रेट: २३४ पेक्षा जास्त

राजस्थान रॉयल्ससाठी सलामीला येणारा हा युवा फलंदाज सध्या स्पर्धेतील सर्वात ‘धुवांधार’ फलंदाज मानला जात आहे. ज्या वयात मुले कारकीर्दीची स्वप्ने पाहतात, त्या वयात वैभवने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. भारताचा हा नवा ‘स्टार’ येणाऱ्या काळात क्रिकेट विश्वावर राज्य करेल, असेच चिन्हे सध्या दिसत आहेत.

‘OBS’ चा विळखा! आयपीएलमध्ये Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली चर्चेचा विषय; पहा Video

Web Title: Vaibhav suryavanshi ipl 2026 performance pakistan expert reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • pakistan
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर
1

उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming
2

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming

IND vs ENG: ‘आता तर तो स्लेजिंगही करायला लागला…’, इंग्लंडमध्ये पाऊल ठेवायच्या आधीच इंग्रजांना Vaibhav Sooryavanshi ची दहशत
3

IND vs ENG: ‘आता तर तो स्लेजिंगही करायला लागला…’, इंग्लंडमध्ये पाऊल ठेवायच्या आधीच इंग्रजांना Vaibhav Sooryavanshi ची दहशत

T20 Series: ५६ बॉल्स अन् १३६ रन्स! Tilak Verma चे मैदानावर वादळ; विरोधी गोलंदाजांना फुटला घाम
4

T20 Series: ५६ बॉल्स अन् १३६ रन्स! Tilak Verma चे मैदानावर वादळ; विरोधी गोलंदाजांना फुटला घाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.