Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs Eng: वरूण चक्रवर्तीने रचला T20I मध्ये इतिहास, वर्ल्ड रेकॉर्ड करून जागतिक क्रिकेटमध्ये कमावले नाव

तिसऱ्या टी-२० मध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. वरूण चक्रवर्तीच्या बॉलिंगने मात्र कमाल दाखवली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 29, 2025 | 11:15 AM
वरूण चक्रवर्तीच्या नावे नवा वर्ल्ड रेकॉर्ड

वरूण चक्रवर्तीच्या नावे नवा वर्ल्ड रेकॉर्ड

Follow Us
Close
Follow Us:

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला (IND vs ENG, 3rd T20I). इंग्लंडने भारताचा २६ धावांनी पराभव केला, हा इंग्लंडचा टी-२० मालिकेतील पहिला विजय आहे. भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, करिष्माई भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्तीने ५ विकेट घेत खळबळ उडवून दिली. वरूणने ही कामगिरी करत जागतिक रेकॉर्ड बनवला आहे.

वरुणने टी२० मध्ये दुसऱ्यांदा ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. जेव्हा जेव्हा वरुणने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५ बळी घेतले आहेत तेव्हा भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे असे चित्र सध्या आहे. मात्र तिसऱ्या टी-२० मध्ये, वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत २४ धावा देत ५ बळी घेत चमत्कार केला. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, वरुण चक्रवर्तीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एक खास विश्वविक्रम रचला. वरुण हा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कमीत कमी सामन्यांमध्ये दोनदा ५ बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.

वरूणचा वर्ल्ड रेकॉर्ड 

वरुण चक्रवर्तीने त्याच्या १६ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्यांदा ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याच वेळी, अजंता मेंडिसने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २२ सामन्यांमध्ये दोनदा ५ विकेट्स घेतल्या होत्या.

  • १६ – वरुण चक्रवर्ती (भारत)
  • २२ – अजंता मेंडिस (श्रीलंका)
  • ३० – अ‍ॅश्टन अ‍ॅगर (ऑस्ट्रेलिया)
  • ३४ – कुलदीप यादव (भारत)
  • ३७-इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका)
सध्या जागतिक रेकॉर्डमधील अशी संख्या आणि या खेळाडूंची नावं यादीत समाविष्ट आहेत. 

IND vs ENG 3rd T20: इंग्लंडचं कमबॅक; भारताला सिरीज जिंकण्यापासून रोखलं, २६ धावांनी केला पराभव

सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

याशिवाय, वरुण चक्रवर्ती सलग १० डावांनंतर टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. वरुणने आतापर्यंत सलग १० टी-२० डावांनंतर २७ विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. राशिद खानने सलग १० डावात ३० विकेट्स घेतल्या असल्या तरी, त्यावेळी अफगाणिस्तान पूर्ण सदस्य संघ नव्हता. याचा अर्थ वरुणने पूर्ण सदस्य संघासाठी हा महान विक्रम स्वतःकडे केला आहे.

सलग १० टी२० डावांमध्ये भारतीयांनी घेतलेले सर्वाधिक बळी

  • २७ – वरुण चक्रवर्ती*
  • २५ – कुलदीप यादव
  • २२ – अर्शदीप सिंग
  • २२ – युजवेंद्र चहल
सलग १० टी२० डावांमध्ये सर्वाधिक विकेट्स (पूर्ण सदस्य संघ)
  • २७-वरुण चक्रवर्ती
  • २६ – अजंता मेंडिस
  • २५-कुलदीप यादव
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १७१ धावा केल्या, त्यानंतर भारतीय संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १४५ धावाच करू शकला. वरुणला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. इंग्लंडकडून बेन डकेटने ५१ धावांची खेळी केली. लियाम लिव्हिंगस्टोनने ४३ धावा केल्या. आता मालिकेतील चौथा टी-२० सामना ३१ जानेवारी रोजी पुण्यात खेळला जाईल.

IND vs ENG 3rd T20: वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने केली इंग्लंडची धुलाई; टीम इंडियासमोर 172 धावांचे लक्ष्य

Web Title: Varun chakravarthy world record in t20i becomes fastest 1st bowler to pick two t20i fifers in ind vs eng 3rd t20i

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • cricket news
  • IND Vs END

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.